Akshay Kumar And Tiger Shroff Saam Tv
मनोरंजन बातम्या

लखनऊमध्ये Akshay Kumar आणि Tiger Shroff वर प्रेक्षकांनी फेकले बूट-चप्पल, VIDEO होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं?

Priya More

Bade Miyan Chote Miyan Movie:

बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सध्या त्यांच्या आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटामुळे (Bade Miyan Chote Miyan Movie) चर्चेत आहेत. हा चित्रपट यावर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये दोघेही जबरदस्त ॲक्शन करताना दिसणार आहेत. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दोघेही नवाबांचे शहर अशी ओळख असलेल्या लखनऊला गेले होते.

अक्षय आणि टायगरला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमात मोठा गोंधळ झाला. यावेळी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ उभे राहिलेल्या स्टेजच्या दिशेने चप्पल आणि बूट फेकण्यात आले. त्याचसोबत घटनास्थळी दगडफेक देखील झाली. यावेळी अनियंत्रित गर्दी झाली होती त्यामुळे पोलिसांना देखील गर्दीवर नियंत्रण मिळवणं कठीण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला. या घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचे लखनऊमधील चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. दोन्ही कलाकार लखनऊच्या घंटाघरला पोहोचले होते. या कार्यक्रमाची माहिती मिळताच अवघ्या अर्ध्या तासांत याठिकाणी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. दोघांच्याही चाहत्यांनी त्यांची एक झलक पाहण्यासाठी याठिकाणी गर्दी केली होती. यावेळी अक्षय आणि टायगरने आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. चाहत्यांनी अक्षयला गाणं गाण्याची विनंती केली. अभिनेत्याने लोकांना शांत राहण्याचे आवाहनही केले होते. पण काही वेळातच गर्दी इतकी वाढली की धक्काबुक्की सुरू झाली.

अक्षय कुमारने गाणं न गायल्यामुळे उपस्थित प्रेक्षक नाराज झाले आणि त्यांनी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ उभ्या राहिलेल्या स्टेजच्या दिशेने बूट आणि चप्पल फेकण्यास सुरुवात केली. स्टेजच्या दिशेने इतका चप्पल आणि बूट फेकण्यात आले की घटनास्थळावर चप्पलांचा खच पडला होता. याठिकाणी गर्दी इतकी झाली होती की पोलिसांना त्यावर नियंत्रण मिळवणं देखील कठीण झाले होते. अशामध्ये घटनास्थळावर गोंधळाचे वातावरण आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. अशामध्ये पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज केला होता. हा कार्यक्रम संपण्यापूर्वीच अक्षय आणि टायगर त्याठिकाणावरून निघून गेले.

दरम्यान, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या 'बडे मियाँ और छोटे मियाँ' या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करत आहेत. दिग्दर्शकाने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित फोटो शेअर केले आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, पृथ्वीराज सुकुमारन, अलाया एफ आणि रोनित रॉय हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पूजा एंटरटेनमेंट आणि एएझेड फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. एप्रिल 2024 मध्ये ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग स्कॉटलंड, लंडन, भारत आणि यूएईमध्ये करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT