प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांच्या निधनाच्या आज बातमी समोर आली आणि साऱ्यांचं धक्का बसला. ते फक्त गायक नव्हते तर त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून ते अनेकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग होते. आजही कित्येक लोकांची सकाळ त्यांचं गाणं ऐकून सुरु होते आणि कित्येक लोकांची रात्रही त्यांच गाणं ऐकूनच होते.
त्यांच्या जाण्याने फक्त बॉलीवूडलाच नाही तर देशातील कोट्यवधी लोकांचा धक्का बसला आहे, जे त्यांचे चाहते आहेत. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांनी 50 हून अधिक अल्बम आणि 'चिट्ठी आई है' आणि 'जिए तो जिए कैसे' यासह काही सदाबहार चित्रपट गाणं गात प्रेक्षांच्या मनात कायमचं घर केलं. त्यांची गाणे चात्यांसाठी कधीच जुनी झाली नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अनेक लोक आजही 'चिट्ठी आई है' हे गाणं ऐकतात, अन् नुसतं ऐकत नाही, तर ते या गाण्याला स्वतःशी जोडून पाहतात. हे गाणं ऐकल्यानंतर प्रदेशात राहणारे अनेक भारतीय पुन्हा देशात परतले होते, असं बोललं जातं. मात्र हेच गाणं गाण्यासाठी आधी त्यांनी नकार दिला होता. नेमका काय होता तो किस्सा जाणून घेऊ...
Lehren दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत पंकज उधास यांनी 'चिट्ठी आई है' गाण्यास सुरुवातीच्या काळात नकार दिला होता, असं सांगितलं होतं. संजय दत्त अभिनीत 'नाम' चित्रपटातील हे गाणे आजही संजयच्या सर्वात प्रतिष्ठित गाण्यांपैकी एक म्हणून लक्षात ठेवले जाते.
याबाबत बोलताना पंकज उधास यांनी सांगितलं होतं की, “जेव्हा या चित्रपटाची निर्मिती होतं होती, तेव्हा या गाण्यासाठी माझ्या नावाचा विचार करण्यात आला होता. सलीम खान साहेबांनी कथा लिहिली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक महेश भट्ट साहब होते. राजेंद्र कुमार हे निर्माते होते. हे गाणे रंगमंचावरील अभिनेत्याने नव्हे, तर खऱ्या आयुष्यातील गायकाने गायले पाहिजे, अशी त्यांची इच्छा होती. ''
ते म्हणाले होते की, ''चित्रपटात एक सीन असा आहे की, एक लाईव्ह कॉन्सर्ट आहे आणि एक गायक गात आहे. संजय दत्तच्या मनात बदल होतो आणि तो देशात परततो. त्यामुळे त्यांना खऱ्या आयुष्यातील गायक हवा होता. त्यांना एका गायकाची गरज होती, जो लोकांमध्ये लोकप्रिय आणि ओळखला जातो, म्हणून त्यांनी माझा विचार केला. त्यामुळे जेव्हा निर्मात्याने मला हे गाणे करण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी मला कल्पना सांगितली नाही, उलट ते मला म्हणाले, पंकज, तुला आमच्या चित्रपटात यावे लागेल.. आणि मी घाबरलो. त्यांनी मला सांगितले की, त्यांची मुले कुमार गौरव आणि संजय दत्त या चित्रपटात आहेत आणि मलाही चित्रपटाचा भाग व्हायचे आहे.''
त्यांनी पुढे सांगितलं होते की, ''त्याने मनोजजींना बोलावले आणि म्हणाले, तुमच्या भावाला शिष्टाचार नाही. मग मनोजजींनी मला फोन केला आणि विचारले, काय प्रॉब्लेम आहे? त्यावेळी मी त्यांना सांगितलं मी चित्रपटात अभिनय नाही करू शकत. त्यामुळे माझ्या भावाने मला चित्रपटात काम करायचे नसेल तर निर्मात्याला फोन करून सांगावे, असे सुचवले. म्हणून मी त्यांना फोन केला, माफी मागितली आणि मला चित्रपटात काम करायचे नाही, असे सांगितले. त्यावर ते म्हणाले, तुला चित्रपटात काम करायला कोणी सांगितले? तेव्हा त्यांनी मला चित्रपटात पंकज उधासच्या भूमिकेत दिसावे, अशी त्यांची इच्छा असल्याचे सांगितले. मग मी शुद्धीवर आलो आणि हे गाणं गाण्यास होकार दिला. त्यानंतर पुढे जे झालं, तो इतिहास आहे.''
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.