Anushka And Virat Marriage Anniversary Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anushka Sharma आणि Virat Kohli ने साजरा केला लग्नाचा ६ वा वाढदिवस, क्युट फोटो शेअर करत म्हणाली...

Anushka And Virat Marriage Anniversary: लग्नाचा सहावा वाढदिवस या कपलने मोठ्या उत्साहात साजरा केला. सध्या सोशल मीडियावर या कपलच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल होत आहेत.

Priya More

Anushka Sharma And Virat Kohli:

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे बॉलिवूडमधील पॉवरफूल आणि सर्वांचे आवडते कपल आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अनुष्का आणि विराटने २०१७ मध्ये इटलीमध्ये गुपचूप लग्न केले होते. ११ डिसेंबर २०२३ ला या कपलच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाली.

लग्नाचा सहावा वाढदिवस या कपलने मोठ्या उत्साहात साजरा केला. सध्या सोशल मीडियावर या कपलच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट्स करत दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी आपल्या लग्नाचा सहावा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा केला. अनुष्का शर्माने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. मंगळवारी अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पती विराट कोहलीसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये अनुष्काने तिच्या पतीला मिठी मारल्याचे दिसत आहे. दोघेही ब्लॅक आउटफिटमध्ये खूपच क्युट दिसत आहेत.

अनुष्का शर्माने स्ट्रॅपलेस ड्रेस परिधान केला आहे. तिने लाइट मेकअप करत केस मोकळे साडले आहेत. या लूकमध्ये अनुष्का खूपच सुंदर दिसत आहे. तर विराटने ब्लॅक कलरचा शर्ट आणि पँट परिधान केली आहे. या लूकमध्ये तो देखील खूपच हँडसम दिसत आहे. विराटसोबतचा क्युट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत अनुष्काने त्याला सुंदर कॅप्शन दिले आहे. तिने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'एक दिवस प्रेम, मित्र आणि कुटुंबाने भरलेला आहे. इन्स्टाग्रामसाठी पोस्ट करण्यास खूप उशीर झाला. ६ वर्षे झाली आणि माझ्या न्यूमरो यूनोसोबत असंख्य वर्षे शिल्लक राहिली.'

विराट कोहलीने देखील आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये अनुष्का पती विराटला मिठी मारताना दिसत आहे. या फोटोमध्ये ती तिचा बेबीबंप लपवताना दिसत आहे. एकमेकांच्या प्रेमात हरवलेले हे कपल कॅमेऱ्याकडे पाहत पोज देताना दिसत आहेत. विराटने हार्ट इमोजी पोस्ट करत अनुष्काप्रती प्रेम व्यक्त केले आहे.

अनुष्का शर्माने इन्स्टाग्राम स्टोरीवर लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये विराट केक कटिंगदरम्यान मजा-मस्ती करताना दिसत आहे. आणखी एका फोटोत दोघेही एकत्र केक कापताना दिसत आहेत. दुसऱ्या एका फोटोमध्ये विराट आणि अनुष्का कुटुंब आणि मित्रांसोबत फोटो काढण्यासाठी पोज देताना दिसत आहेत. दरम्यान, अनुष्का शर्मा सध्या दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सुरु आहेत. पण अद्याप तिने अधिकृत घोषणा केली नाही. अनुष्का आणि विराटला वामिका नावाची मुलगी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक

Solapur Tourism: सोलापूरपासून जवळ असलेल्या 'या' हिल स्टेशनला गेलात का? पाहून प्रेमात पडाल

Shravan Special Kabab : श्रावणात करा हे चमचमीत काळा चणा कबाब, चिकन कबाबची चव विसराल

Oval Stadium History : 'ओव्हल स्टेडीयम' हे नाव कसं पडलं? वाचा संपूर्ण इतिहास

Redmi Note 14: किंमत स्वस्त अन् कॅमेरा मस्त; जाणून घ्या Redmi Note 14 SE स्मार्टफोनचे धमाल फीचर्स

SCROLL FOR NEXT