Dinesh Karthik, Sachin Tendulkar Anushka Sharma
Dinesh Karthik, Sachin Tendulkar Anushka SharmaInstagram @dk00019

Anushka Sharma IND-PAK Match: विराटसाठी कायपण! प्रेग्नंसीच्या चर्चेदरम्यान टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी अनुष्का शर्मा थेट अहमदाबादला

Anushka Sharma Video: अहमदाबाद एअरपोर्टवरील अनुष्काचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Published on

Sachin Tendulkar, Anushka Sharma, Dinesh Karthik In One Frame:

शनिवारी १४ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तानचा क्रिकेटचा सामना होणार आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा अहमदाबाद एअरपोर्टला स्पाॅट झाली आहे. अनुष्का शर्मा पती विराट कोहली आणि टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी अहमदाबादला गेली आहे.

अहमदाबाद एअरपोर्टवरील अनुष्काचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. कडक सुरक्षाव्यवस्थेत अनुष्का एअरपोर्ट बाहेर आली. अनुष्का यावेळी खूप आरामात चालत होती. काही दिवसांपासून अनुष्का दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत.

अनुष्का शर्माचा लूक

अनुष्काच्या व्हायरल व्हिडीओमध्ये तिने संपूर्ण ब्लॅक लूक केला आहे. ब्लॅक टॉप, ब्लॅक वेस्ट कोट आणि ब्लॅक रंगाची पॅन्ट असा लूक अनुष्काने घातली केला होता. त्यावर तिने गॉगल लावला होता आणि केस मोकळे ठेवले होते. फोटोग्राफर्सला पोज न देता अनुष्का थेट कारमध्ये बसली. (Latest Entertainment News)

अनुष्का शर्मासोबत असलेले सुरक्षारक्षक तिचे फोटो काढून नका असे फोटोग्राफर्स आणि फॅन्सला सांगत होते. हा व्हिडिओ ANI ने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'अभिनेत्री अनुष्का शर्मा आज अहमदाबादमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान आयसीसी क्रिकेट विश्वचषक सामन्यासाठी अहमदाबादला आली आहे' असे त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे.

Dinesh Karthik, Sachin Tendulkar Anushka Sharma
Priya Bapat Post: पहिल्यांदाच दिसला प्रिया बापटचा असा अवतार, सोशल मीडियावर रंगली तुफान चर्चा; पाहा फोटो

अनुष्का शर्मा आणि सचिन तेंडुलकर यांचा देखील फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो दिनेश कार्तिकने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता. तसेच त्याने हा फोटो शेअर करता कॅप्शन दिले आहे की, 'रॉयल्टी अॅट ३५००० फूट' या कॅप्शन दिनेश कार्तिकने विमानाचे चिन्ह देखील तिथे मेंशन केले आहे. याचा अर्थ हा फोटो विमानात ३५००० फूटावर काढण्यात आला आहे. (Celebrity)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com