बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) त्याच्या आगामी 'डंकी' चित्रपटामुळे (Dunki Movie) चर्चेत आहे. 'जवान' (Jawan Movie) आणि 'पठान'च्या (Pathan Movie) यशानंतर शाहरुख खान 'डंकी'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. २०२३ हे वर्ष शाहरुख खानसाठी खूपच लकी ठरत आहे.
या वर्षातला हा शाहरुख खानचा तिसरा चित्रपट आहे ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशामध्ये हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी शाहरुख खान वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी पोहचला आहे. 'जवान' आणि 'पठान' चित्रपट रिलीज होण्यापूर्वी देखील तो देवीच्या दर्शनासाठी गेला होता. त्यामुळे यावर्षात शाहरुख खानची वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाण्याची ही तिसरी वेळ आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'किंग खान' वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेल्याचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शाहरुख खान वैष्णोदेवीच्या मंदिराच्या दिशेने जाताना दिसत आहे. त्याने वैष्णोदेवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीचे दर्शन घेतले. सोशल मीडियावर शाहरुख खानचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये शाहरुख खानची मॅनेजीर पूजा ददलानी देखील त्याच्यासोबत वैष्णोदेवीच्या मंदिरामध्ये दिसत आहे.
शाहरुख खान आपल्या सुरक्षारक्षकांसोबत वैष्णोदेवीच्या मंदिराच्या दिशेने जाताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी शाहरुखने आपला चेहरा हुडी जॅकेटच्या कॅपने झाकला होता. कोणी आपल्याला ओळखू नये यासाठी शाहरुखने आपला चेहरा लपवला होता. शाहरुख खानने आता त्याच्या प्रत्येक चित्रपटाच्या रिलीजपूर्वी वैष्णोदेवीचे दर्शन घेण्याची परंपरा बनवली असल्याचे म्हटले जात आहे.
याआधी 'पठान' आणि 'जवान' रिलीज होण्यापूर्वी शाहरुखने वैष्णो देवीचे दर्शन घेतले होते. त्याचे ते दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले होते. या दोन्ही चित्रपटांनी रेकॉर्डब्रेक कमाई केली. हिच परंपरा पुढे नेत शाहरुख खान आता 'डिंकी' चित्रपट रिलीज होण्यापूर्वी वैष्णोदेवीचे आशीर्वाद घेण्यासाठी गेला होता. त्याने डंकी चित्रपट देखील सुपरहिट ठरावा अशी देवीकडे प्रार्थना केली. शाहरुखसोबतच चाहत्यांनाही आशा आहे की त्याचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल.
दरम्यान, 'डिंकी' चित्रपट राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केला असून 21 डिसेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खानशिवाय या चित्रपटात तापसी पन्नू, विकी कौशल आणि बोमन इराणी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे बजेट 120 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. 'डिंकी' बॉक्स ऑफिसवर प्रभास आणि प्रशांत नीलच्या 'सालार' चित्रपटाशी टक्कर देणार आहे. त्यामुळे हा चित्रपट देखील 'पठान' आणि 'जवान'प्रमाणे कमाई करेल की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.