Happy Birthday Rajinikanth: रजनीकांत यांच्याबद्दल माहिती नसलेल्या 'या' १० गोष्टी, वाचून तुम्हीही व्हाल 'जबरा फॅन'

Rajinikanth Bday Special: रजनीकांत यांचा फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये मोठा चाहतावर्ग आहे. भारतामध्ये काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत त्यांच्या चाहत्यांची मोठी लिस्ट आहे. आज रजनीकांत हे आपला ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत.
Rajinikanth Bday
Rajinikanth BdaySaam Tv
Published On

Rajinikanth Birthday:

साऊथ फिल्म इंडस्ट्री (South Film Industry) आणि बॉलीवूडमध्ये (Bollywood) आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर वेगळी छाप टाकणाऱ्या रजनीकांत (Superstar Rajinikanth) यांना आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण रजनीकांत यांचे फॅन आहेत. रजनीकांत यांनी आपल्या करिअरला सुरुवात केल्यापासून ते आतापर्यंत आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. त्यांनी 'जेलर' चित्रपटाच्या माध्यमातून पुनरागमन केले. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला आणि तो बॉक्सऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रजनीकांत यांचा फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये मोठा चाहतावर्ग आहे. भारतामध्ये काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत त्यांच्या चाहत्यांची मोठी लिस्ट आहे. आज रजनीकांत हे आपला ७३ वा वाढदिवस (Rajinikanth Birthday) साजरा करत आहेत. आजचा दिवस रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी खूपच खास आहे. ते सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. रजनीकांत यांच्या आयुष्याशीसंबंधित काही गोष्टी अनेकांना माहिती नाहीत. आज आपण त्यांच्या आयुष्याशीसंबंधित १० गोष्टी जाणून घेणार आहोत. जे वाचून तुम्ही देखील त्यांचा जबरा फॅन व्हाल...

Rajinikanth Bday
Kase Visru Song Released: अंकिता वालावलकरचं नवं गाणं रिलीज, ‘कसे विसरु’ मध्ये कोकण हार्टेडसोबत दिसणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता

- १२ डिसेंबर १९५० रोजी कर्नाटकातील बंगळुरू येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या या अभिनेत्याचे खरे नाव रजनीकांत नसून शिवाजी राव गायकवाड आहे. सुपरस्टारचे नाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते.

- दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आज वेगवेगळ्या साऊथ भाषांमध्ये चित्रपट करत असतील पण ते मराठी आणि कन्नड भाषेत लहानाचे मोठा झाले. मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचा डिप्लोमा करताना ते तमिळ शिकले.

- रजनीकांत यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आणि या टप्प्यावर पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली. चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी त्यांनी बस कंडक्टर म्हणून काम केले हे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु घर चालवण्यासाठी त्यांनी कुली आणि सुतार म्हणूनही काम केले हे फार कमी लोकांना माहिती आहे.

Rajinikanth Bday
Animal Hyderabadi Review:'कई लोगा अम्मा, बहीण भी नवाजते रहे'...; अ‍ॅनिमलचा हैदराबादी रिव्ह्यू ऐकलाय का?

- फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय सुपरस्टार मानले जाणारे रजनीकांत यांनी आपल्या करिअरची सुरुवात हीरोच्या भूमिकेने नाही तर खलनायकाच्या भूमिकेने केली. त्याचवेळी १९७७ साली ‘भुवना ओरू केल्विकुरी’ या चित्रपटात त्यांना पहिल्यांदा सकारात्मक भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती.

- रजनीकांत यांचे फॅन फॉलोइंग जबरदस्त असले तरी ते मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्याकडून त्याच्या चित्रपटांची प्रेरणा घेतात. आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या जवळपास ११ चित्रपटांचे रिमेक केले आहेत.

- रजनीकांत गेल्या ५० वर्षांपासून दक्षिणेपासून ते हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. आतापर्यंत त्यांनी १७० चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Rajinikanth Bday
Rajinikanth Birthday: बस कंडक्टर ते साउथ सुपरस्टार; रजनीकांतला ‘असा’ मिळाला पहिला चित्रपट

- पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते सुपरस्टार यांना २०१० मध्ये फोर्ब्स इंडियाने 'सर्वात प्रभावशाली भारतीय' म्हणून घोषित केले होते.

- रजनीकांत हे एकमेव भारतीय अभिनेता आहे. ज्यांचे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या (CBSE) अभ्यासक्रमातील 'फॉम बस कंडक्टर ते सुपरस्टार' या आशयाचा धडा आहे.

- रजनीकांत यांच्या चाहत्यांवर आधारित 'फॉर द लव्ह ऑफ अ मॅन' हा चित्रपट २०१५ मध्ये ७१ व्या व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झाला होता.

- २०१० मध्ये त्यांचा साय-फाय चित्रपट, 'एंथिरन' हा IMDb च्या जगभरातील टॉप ५० चित्रपटांमध्ये स्थान मिळवणारा एकमेव तमिळ चित्रपट ठरला आहे.

Rajinikanth Bday
Randeep And Lin Reception Party: रणदीप हुड्डा आणि लिन लॅशरामने लग्नानंतर दिली जंगी रिसेप्शन पार्टी, कपलचे क्युट फोटो व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com