Manasvi Choudhary
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार म्हणून रजनीकांत यांचे नाव घेतलं जाते.
आज रजनीकांत आपला ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत.
रजनीकांत यांच्या वैयक्तित आयुष्याबद्दल फार कमी जणांना माहिती आहे.
अभिनेता रजनीकांत यांची लव्ह लाईफ स्टोरी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही.
२६ फेब्रुवारी १९८१ मध्ये रजनीकांत आणि लता रंगाचारी हे विवाहबंधनात अडकले.
१९७९ साली 'गोलमाल' या हिंदी चित्रपटाचा तामिळ रिमेक सुरू असताना रजनीकांत यांच्या लव्हस्टोरीला सुरूवात झाली.
'थिल्लु मल्लु' असं या चित्रपटाचे तामिळ नाव होते. चित्रपटामध्ये रजनीकांत मुख्य भूमिकेत होते.
लता रंगाचारी यांनी रजनीकांत यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्या महाविद्यालयीन शिक्षण घेत होत्या.
एका मासिकासाठी रजनीकांत यांची मुलाखत त्यांना पाहिजे होती. यामुळेच लता यांनी रजनीकांत यांच्याशी संपर्क केला होता.
मुलाखत सुरू असताना रजनीकांत लता यांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी त्याचवेळेस त्यांना प्रपोज केला.