Akshay Kumar Trolled Due To Pan Masala Ad Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar Video: पुन्हा तीच चूक! ट्रोलिंग होऊनही अक्षय कुमारने पुन्हा केली पानमसाल्याची जाहिरात, नेटिझन्सनी घेतली चांगलीच शाळा

Akshay Kumar Trolled Due To Pan Masala Ad: पान मसाल्याच्या जाहिरातीमध्ये काम केल्यामुळे अक्षयला आधीच ट्रोल करण्यात आले होते. त्यावेळी त्याने माफी देखील मागितली होती.

Priya More

Akshay Kumar Trolled:

बॉलिवूडचा (Bollywood) 'खिलाडी' अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'मिशन रानीगंज' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून समिश्र प्रतिसाद मिळत आहे. याच दरम्यान अक्षय कुमार चर्चेत आला आहे. अभिनेता त्याच्या चित्रपटामुळे नाही तर एका जाहिरातीमुळे चर्चेत आला आहे.

पान मसाल्याच्या जाहिरातीवरून अक्षय कुमारला ट्रोल केले जात आहे. पान मसाल्याच्या जाहिरातीमध्ये काम केल्यामुळे अक्षयला आधीच ट्रोल करण्यात आले होते. त्यावेळी त्याने माफी देखील मागितली होती. पण आता पुन्हा त्याने या जाहिरातीमध्ये काम केले आहे. त्यामुळे यावेळी नेटिझन्सनी अक्षय कुमारची चांगलीच शाळा घेतली आहे.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण बऱ्याच दिवसांपासून एका लोकप्रिय पानमसाला ब्रँडची जाहिरात करत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्यासोबत या जाहिरातीमध्ये शाहरुख खान दिसला होता. त्यानंतर अजय देवगण, शाहरुख खानसोबत अक्षय कुमारनेही या पानमसालाच्या जाहिरातीत एकत्र काम केले. या जाहिरातीवरून या तिघांना देखील ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर अक्षय कुमारने माफी देखील मागितली होती. आता या तिघांची पानमसाल्याची नवी जाहिरात आली आहे. या जाहिरातीमध्ये बिग बॉस १६ ची लोकप्रिय स्पर्धक सौंदर्या शर्मा ही देखील दिसत आहे. पानमसाल्याची ही नवीन जाहिरात शाहरुख खानच्या फॅन पेजने शेअर केली आहे.

गेल्यावर्षी अक्षय कुमारला पानमसाल्याच्या जाहिरातीवरून चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. अक्षयला त्यावेळी इतकं ट्रोल करण्यात आले होते की त्याने शेवटी चाहत्यांची माफी मागितली होती. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने माफी मागितली होती आणि पानमसाल्याची जाहिरात कधीच करणार नसल्याचे सांगितले होते. मात्र अक्षय कुमार आपले वचन पाळण्यात अपयशी ठरलेला दिसत आहे. दीड वर्षांनंतर पुन्हा तो या जाहिरातीमध्ये दिसला आहे.

अक्षय कुमारला या जाहिरातीवरून नेटिझन्स चांगलेच ट्रोल करत आहे. या जाहिरातीवर कमेंट करत एका युजरने लिहिले की ‘पैशांसाठी अक्षय कुमार काहीही करू शकतो’ दुसऱ्या युजरने कमेंट करत ‘अक्षयचे चित्रपट फ्लॉप होत असल्याने तो पुन्हा पानमसाल्याच्या जाहिराती करतोय’, अशी कमेंट केली. अक्षय कुमारने या जाहिरातीमध्ये पुन्हा काम केल्यामुळे चाहते नाराज झाले आहेत.

अक्षय कुमारने मागच्या वेळी चाहत्यांची माफी मागत पोस्टमध्ये असे लिहिले होते की, 'मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची माफी मागू इच्छितो. मी तंबाखूचे समर्थन करत नसलो आणि करणार नसलो तरीही गेल्या काही दिवसांतील तुमच्या प्रतिसादाने मला खूप प्रभावित केले आहे. वेलची ब्रँडशी असलेल्या माझ्या संबंधाबाबत मी तुमच्या भावनांचा आदर करतो. तसेच, मी जाहिरातीसाठी आकारले जाणारे जाहिरात शुल्क दान करण्याचा निर्णय घेतला आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर अक्षय कुमारनेही घेतला धसका

Grooming Tips For Men: दाढी करण्यासाठी गंजलेला किंवा जुना रेझर वापरण्याचे गंभीर धोके, पुरूषांनी वेळीच घ्या काळजी

Mumbai News: मुंबईतील शिंदेसेनेच्या बड्या नेत्याच्या जीवाला धोका, घर अन् ऑफिसची ३ वेळा रेकी; सलमान खानसोबत जवळचे संबंध

Diwali Ladoo Recipe : रव्याचे लाडू कडक होतात? 'या' सोप्या ट्रिकने बनवा मऊसूत लाडू, तोंडात टाकताच विरघळतील

Shocking : संभाजीनगर हादरले! बाप लेकाची मध्यरात्री निर्घृण हत्या; नेमकं प्रकरण काय? वाचा

SCROLL FOR NEXT