Akshay Kumar With Daughter  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar ची मुलगी निताराला कुत्र्याचा चावा, ट्विंकल खन्नाने सांगितला तो किस्सा...

Twinkle Khanna On Nitara: 'निताराच्या दोन्ही हातावर कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर तिला इंजेक्शन देण्यात आले होते. असे असताना देखील निताराने त्या कुत्र्याचा बचाव केला होता.', असे ट्विंकलने सांगितले.

Priya More

Akshay Kumar Daughter Nitara Bitten By Dog:

बॉलिवूडचा (Bollywood) 'खिलाडी' अर्थात अभिनेता अक्षय कमार (Akshay Kumar) आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) याची लाडकी मुलगी निताराच्या बाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अक्षयच्या मुलीला पाळीव कुत्रा चावला होता. स्वत: ट्विंकल खन्नाने एका मुलाखतीमध्ये ही गोष्ट सांगितली. ट्विंकलने नुकताच दिलेल्या टाइम्स ऑफ इंडियाच्या मुलाखतीमध्ये ही घटना सांगितली. 'निताराच्या दोन्ही हातावर कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर तिला इंजेक्शन देण्यात आले होते. असे असताना देखील निताराने त्या कुत्र्याचा बचाव केला होता.', असे ट्विंकलने सांगितले.

ट्विंकल खन्नाने या मुलाखतीमध्ये तिच्या चुलत भावाचा पाळीव कुत्रा फ्रेडी आणि मुलगी नितारा यांच्यामध्ये असलेल्या प्रेमाबद्दल सांगितले. ट्विंकलने सांगितले की, निताराने रेबीजचे ३ इंजेक्शन आणि एक टिटनेस इंजेक्शन घेतले. असे असताना देखील तिने कुत्र्याचा बचाव केला. निताराने या घटनेला 'एक अपघात' असे म्हटले आहे. ट्विंकल खन्नाने या मुलाखतीत सांगितले की, 'या ख्रिसमसमध्ये कोणीतरी चुकून मुलांसमोर (आरव आणि नितारा) चिकनची प्लेट ठेवली होती. त्यावेळी फ्रेडी मुलांच्या जवळपासच होता. त्याने प्लेटवर उडी मारली आणि चिकनचे तुकडे खायला सुरुवात केली. माझ्या 11 वर्षाच्या मुलीला भीती वाटत होती की फ्रेडी लाकडाची काठी देखील गिळून टाकेल. त्यामुळे तिने ती काठी बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने निताराचे दोन्ही हात चावले.'

फ्रेडीने चावा घेतल्यावर निताराची प्रतिक्रिया आठवत ट्विंकलने सांगितले की, 'रेबीजचे तीन इंजेक्शन आणि नंतर टिटनेसचे एक इंजेक्शन घेतल्यानंतर देखील निताराला कोणताही पश्चाताप नाही. ती या घटनेला अपघात म्हणते. नितारा म्हणते की, फ्रेडीला मला चावायचे नव्हते आणि जोपर्यंत फ्रेडी ठीक आहे तोपर्यंत काही फरक पडत नाही.'

ट्विंकल म्हणाली की, जर त्याने अनवधानाने आपल्या मुलीची बोटे चावली असती. तर फक्त सतत आरोपच झाले नसते तर 20 वर्षांनंतर तिच्या थेरपी सेशनदरम्यान हा चर्चेचा विषय ठरला असता.' दरम्यान, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांना दोन मुलं आहेत. मुलगा २१ वर्षांचा असून त्याचे नाव आरव आहे. तर मुलीचे नाव नितारा आहे. अक्षय आणि ट्विंकल नेहमी आपल्या मुलांसोतबचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT