Aaradhya Bachchan New Look Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aaradhya Bachchan New Look: अखेर ऐश्वर्याची लाडली आराध्याने बदलली हेअर स्टाईल, Photo एकदा बघाच

Aaradhya Bachchan New Hairstyle: आराध्याचे फोटो आणि व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात.

Priya More

Aaradhya Bachchan Photo:

ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) ही बी-टाऊनची लोकप्रिय आई-मुलीची जोडी आहे. ऐश्वर्या आणि आराध्या नेहमीच सर्वच ठिकाणी स्पॉट होत असतात. पार्टी असो, एअरपोर्ट असो वा कुठल्याही फंक्शनमध्ये ऐश्वर्या आपल्या मुलीला आवर्जुन घेऊन जात असते.

आराध्याचे फोटो आणि व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. आराध्याच्या हेअरस्टाईलवरून ऐश्वर्या रायला अनेकदा टोमणे ऐकावे लागले आहेत. कारण लहानपणापासून ते आतापर्यंत आराध्याला आपण एकाच हेअरस्टाईलमध्ये पाहिले आहे. पण अशामध्ये ऐश्वर्या आणि आराध्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आराध्याने आपली हेअरस्टाईल चेंज केली आहे.

आराध्या बच्चन आपल्या नव्या हेअरस्टाईलमुळे चर्चेत आली आहे. आराध्याच्या चाहत्यांना तिची ही नवी हेअरस्टाईल प्रचंड आवडत आहे. आराध्याचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आराध्या शाळेत गणेश चतुर्थीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाली होती. तिने मित्रांसोबत गणपती बाप्पाला निरोप दिला. बच्चन कुटुंबाची ही मुलगी पांढऱ्या रंगाच्या पंजाबी ड्रेस आणि लाल रंगाच्या ओढणीमध्ये दिसली. आराध्याचे हे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

आराध्याच्या फॅन पेजने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये तिचा लूक आणि डान्ससारखी हेअरस्टाइल लोकांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी आराध्या एका नव्या लूकमध्ये दिसली. आराध्या नव्या लूकमध्ये दिसली खरी पण तिच्या नव्या लूकमध्ये फारसा बदल झालेला नाही. तिने पोनीटेल बांधला आहे आणि पांढऱ्या रंगाचा हेअरबँड घातला आहे.

आराध्याला नेहमीपेक्षा वेगळ्या अंदाजात पाहून तिच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या फोटोंवर कमेंट्स करत आराध्याच्या चाहत्यांनी तिच्या लूकचे कौतुक केले आहे. कोणी 'अप्रतिम' तर कोणी 'सुंदर' म्हणत तिच्या लूकचे कौतुक केले आहे. पण काहींनी तर तिच्या हेअरस्टाईलवरून तिला ट्रोल देखील केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Jalgaon : अंगावर काटा आणणारी घटना! विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Chief Minister Salary : राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किती पगार मिळतो?

Madison Square Garden: न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर 'भारत माता की जय' आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमलं

Nandurbar : बस कंडक्टरकडून विद्यार्थिनींना शिवीगाळ; नंदुरबार बसस्थानकावरील प्रकार, कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT