Yami Gautam Saam Tv
मनोरंजन बातम्या

Yami Gautam Birthday: यामी गौतमला व्हायचं होतं IAS अधिकारी, या मालिका आणि चित्रपटामुळे मिळाली आयुष्याला कलाटणी

Yami Gautam Movie: यामी गौतमीने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही मालिका ‘चांद के पास चलो’मधून केली होती. यामी गौतम आधी टीव्ही मालिकेच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहचली.

Priya More

Yami Gautam Bday Special:

बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतमी (Yami Gautam) आज आपला ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. १० वर्षे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या यामी गौतमीने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही मालिका ‘चांद के पास चलो’मधून केली होती. यामी गौतम आधी टीव्ही मालिकेच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहचली. त्यानंतर तिने मोठ्या पडद्यावर देखील आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकले. यामीच्या वाढदिवसानिमित्त आज आपण तिच्या करिअर, रिअल लाइफबद्दल जाणून घेणार आहोत...

आयएएस अधिकारी व्हायचे होते

28 नोव्हेंबर 1988 मध्ये हिमाचल प्रदेशमध्ये यामी गौतमचा जन्म झाला. अभिनय क्षेत्राते येण्यापूर्वी यामी गौतमला आयएएस अधिकारी व्हायचे होते. पण तिच्या नशिबामध्ये वेगळंच काही लिहिले होते. यामी लॉची विद्यार्थिनी होती हे फार कमी लोकांना माहीत आहे. पण अभिनेत्री बनण्याच्या स्वप्नासाठी तिने शिक्षण अर्धवट सोडले. रिअल लाईफमध्ये नाही तर रील लाईफमध्ये 'बत्ती गुल मीटर चालू' आणि 'ओएमजी 2' सारख्या चित्रपटांमध्ये वकील बनून तिने आपले स्वप्न पूर्ण केले.

या मालिकेने बदललं आयुष्य

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिने 'चांद के पार चलो' सारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले. त्यासोबतच तिने 'ये प्यार ना होगा कम' या मालिकेत देखील काम केले. तसंच 'किचन चॅम्पियन' सीझन 1 सारख्या शोमध्ये देखील ती दसली. 'ये प्यार ना होगा कम' या मालिकेने तिच्या आयुष्याला कलाटणी दिली. या मालिकेमुळे ती घराघरामध्ये पोहचली.

६ भाषांमध्ये केलंय काम

यामीने फक्त हिंदींच नाही तर कन्नड, तेलुगू, पंजाबी, मल्याळम आणि तमिळ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'विक्की डोनर' चित्रपटामुळे यामीचे आयुष्य बदललं. यामी गौतमने 'विकी डोनर' या चित्रपटानंतर 'सनम रे', 'बदलापूर', 'काबिल', 'सरकार 3', 'बत्ती गुल मीटर चालू', 'उरी', 'बाला', 'भूत पोलिस', 'ए थर्सडे', 'चोर निकल कर भागा', 'ओएमजी 2' या चित्रपटामध्ये काम केले. तिचे हे चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी देखील खूप चांगली पसंती दिली.

घरातून मिळा अभिनयाचा वारसा

यामीचे वडील मुकेश गौतम हे पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. तिच्या कुटुंबातील ती एकमेव मुलगी नाही जिने चित्रपट आणि अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आहे. तिची बहीण सुरिली गौतम ही देखील पंजाबी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा आहे. दोन्ही बहिणींमध्ये असलेले आश्चर्यकारक साम्य पाहून तुम्हाला धक्का बसेल. यामीला घरातून अभिनयाचा वारसा मिळाला आहे.

चहाप्रेमी आहे यामी गौतम

यामी गौतमला भारतीय खाद्यपदार्थ खूप आवडतात. डोसा, इडली, सांबार आणि वडा हे तिचे आवडते पदार्थ आहेत. यामी गौतमला चहा प्यायला खूप आवडते. चहाशिवाय ती राहू शकत नाही. जेव्हा ती परदेशात प्रवास करते तेव्हा ती स्वत:सोबत चहाची किट कॅरी करतो. यामी गौतमीला जिमला जायला अजिबात आवडत नाही. पण ती मोकळ्या जागेवर वर्कआऊट करून फिट राहते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैकिांनी फोडलं, पाहा VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्याला तोबा गर्दी, वरळी डोमबाहेर कार्यकर्त्यांच्या रांगा

Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

SCROLL FOR NEXT