Happy Birthday Yami: यामी गौतम बनणार क्राईम रिपोर्टर, प्रकरण उलगडताना होईल का 'लॉस्ट'

सध्या यामी चर्चेत आहे तिच्या आगामी चित्रपटामुळे. ‘लॉस्ट’ हा तिचा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
Yami Gautam
Yami GautamSaam Tv

Happy Birthday Yami: वैश्विक कोरोना महामारीमुळे चित्रपटगृहे बंद होती, त्यामुळे अनेक चित्रपट थेट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले. पण आता चित्रपटगृहे उघडली असली तरी काही चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. चित्रपट निर्मात्यांनी बॉक्स ऑफिस कलेक्शनचा विचार करता त्यांचे चित्रपट OTT वर प्रदर्शित करणे सुरक्षित वाटत आहे. अशा परिस्थितीत यामी गौतमचा 'लॉस्ट' हा चित्रपटही थिएटरमध्ये प्रदर्शित न होता थेट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे.

Yami Gautam
Ved Marathi Movie: 'वेड' मधील पहिले रोमॅंटिक गाणे लीक, सोशल मीडिया सर्वत्र चर्चा

आज अभिनेत्री यामी गौतमचा वाढदिवस आहे. यामी गौतमचा जन्म हिमाचल प्रदेशच्या बिलासपुर येथे झाला होता. सध्या यामी चर्चेत आहे तिच्या आगामी चित्रपटामुळे. ‘लॉस्ट’ हा तिचा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

तिचा हा आगामी चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून थ्रिलर चित्रपट आहे. एक नाट्यकर्मी अचानक बेपत्ता होण्यामागील सत्य शोधण्यासाठी एक तरुण क्राईम रिपोर्टर कामाला लागतो. अशी या चित्रपटाची कथा आहे. चित्रपटाचे लेखन श्यामल सेनगुप्ता यांचे असून रितेश शाह यांचे संवाद आहेत. नुकताच गोव्यात पार पडलेल्या इफ्फी पुरस्कारात या चित्रपटाचे स्क्रिनिंग ही झाले.

चित्रपट झी 5 वर प्रदर्शित होणार असून चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच आहे. चित्रपट कुठे प्रदर्शित होणार हे जाहीर झाले असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी केले असून निर्मितीची धुरा झी स्टुडिओजच्या खांद्यावर होती. चित्रपटात मुख्य भूमिकेत पंकज कपूर, राहुल खन्ना, नील भूपालम, पिया बाजपी आणि तुषार पांडे हे कलाकार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com