Ved Marathi Movie: रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा दिग्दर्शक रितेश देशमुख यांनी केली होती. कालच चित्रपटाच्या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाल्याची सर्वत्र चर्चा होत होती. तेच आता गाणे लीक झाल्याची माहिती समोर आली आहे.
काल हे गाणे युट्युबवर लीक झाल्याची चर्चा होत आहे. हे गाणे आज अर्थात मंगळवारी प्रदर्शित होणार होते. पण गाणे प्रदर्शित होण्यापूर्वीच लिक झाल्याने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. हे चित्रपटातील पहिलेच रोमॅंटिक गाणे असून गाण्यात रितेश देशमुख आणि जिया शंकर दिसत आहे.
रितेश आणि जिया हे दोघेही खास रोमॅंटिक क्षण एकांतात एकत्र घालवताना दिसत आहे. चित्रपटातील हे पहिलेच गाणे लीक झाल्याने सर्वत्र चर्चा होत आहे. हे गाणे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जोडी अजय- अतुलने गायले आहे. त्यांच्या या खास आवाजाने नक्कीच चाहते मंत्रमुग्ध होतील हे नक्कीच.
वेड चित्रपटाच्या माध्यमातून रितेश दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटात रितेश सत्या नावाचे पात्र साकारत आहे. सोबतच चित्रपटात जेनेलिया डिसूझाही मुख्य भूमिकेत दिसत आहे. या दोघांसोबतच जिया शंकर देखील चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.रितेश देशमुख दिग्दर्शित चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सलमान खान सोबत मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफही चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
जेव्हा वेड चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता तेव्हा त्याची तुलना नागा चैतन्य-सामंथाचा तेलुगू चित्रपट मजिलीशी तुलना करण्यात आली होती. जेनेलियाने 2014 मध्ये 'लय भारी' या चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले होते. चित्रपट प्रदर्शनानंतर चित्रपट चांगलाच हिट ठरला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.