The Kashmir Files: इफ्फीमध्ये मुख्य ज्युरींचा 'द काश्मिर फाईल्स' वर निशाणा, सर्वच स्तरातून लॅपिडवर टीकास्त्र

अभिनेता अनुपम खेर यांनी 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाला अश्लील आणि अपप्रचार म्हणून संबोधल्याबद्दल IFFI ज्युरी प्रमुख नादव लॅपिड यांना फटकारले आहे.
The Kashmir files Movie
The Kashmir files Moviesaam tv
Published On

The Kashmir Files: अभिनेता अनुपम खेर यांनी 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाला अश्लील आणि अपप्रचार म्हणून संबोधल्याबद्दल IFFI ज्युरी प्रमुख नादव लॅपिड यांना फटकारले आहे. त्याचवेळी, चित्रपट निर्माते अशोक पंडित, इस्रायलचे भारतातील राजदूत आणि मुंबईतील इस्रायलचे महावाणिज्यदूत कोबी शोशानी यांनीही लॅपिडच्या विधानावर आक्षेप नोंदवला आहे. या फिल्म फेस्टिव्हलमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये इफ्फीचे प्रमुख लॅपिड चित्रपटाबद्दल वादग्रस्त विधान करताना दिसत आहे.

The Kashmir files Movie
Mumbai News : मुंबईत वेबसीरीज तयार करणाऱ्या परदेशी कलाकारांविरोधात गुन्हा नोंद; कारण?

या पुरस्कार सोहळ्याचे जनसंपर्क सदस्यांनी समरोप समारंभात या चित्रपटाबद्दल अश्लिल टिप्पणी केल्याची पुष्टी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा सर्वत्र प्रहार करत चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट केले आहे. ते या ट्विटमध्ये म्हणाले, खोटे कितीही उंच असले तरी सत्याच्या तुलनेत ते नेहमीच लहान असते. यासोबतच अनुपम खेर चित्रपटातील काही खास फोटोही ट्विट केले आहेत.

सोबतच चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनीही लॅपिड यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. त्यांनीही ट्विटच्या माध्यमातून आपला निषेध नोंदवला आहे. चित्रपट निर्माते अशोक पंडीत ट्विट करत म्हणतात,'द काश्मीर फाइल्स या चित्रपटावर लॅपिडने वापरलेल्या भाषेवर माझा तीव्र आक्षेप आहे. ३ लाख काश्मिरी हिंदूंचे हत्याकांड दाखवणारा चित्रपट अश्लील म्हणता येणार नाही. एक चित्रपट निर्माता आणि काश्मिरी पंडित या नात्याने मी दहशतवादाला बळी पडलेल्यांच्या वागणुकीचा मी तिव्र निषेध करतो.

या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय महोत्सवात स्थान मिळण्याबाबत इफ्फी ज्युरी प्रमुख नादव लॅपिड यांनी खंत व्यक्त केली आहे. या सोहळ्यात लॅपिड म्हणतात, “या महोत्सवतील १५ वा चित्रपट ‘द काश्मिर फाईल्स’ पाहून आम्हा सगळ्यांनाच धक्का बसला. आम्ही खूपच अस्वस्थ झालो. आमच्या मते हा चित्रपट एका विशिष्ट मतप्रवाहाचा प्रचार करणारा (Propogenda) आणि असभ्य(वल्गर) चित्रपट आहे. एवढ्या प्रतिष्ठित सोहळ्यात या चित्रपटाला स्थान मिळणं हे खूपच अयोग्य आहे.”

सोशल मीडियावर हा व्हिडिओ बराच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी विवेक अग्निहोत्री यांना टॅग करून यावर आपले स्पष्ट मत व्यक्त करण्याची विनंती केली आहे. ‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाला भारतात प्रदर्शित करण्याआधी इतर देशांमध्ये दाखवण्यात आले होते. शिवाय या चित्रपटाला भारतात अभूतपूर्व यश प्राप्त झाले होते. या चित्रपटाच्या यशानंतर विवेक अग्निहोत्री कोविड काळातील लसीकरण या विषयावर चित्रपट आपल्या चाहत्यांसाठी घेऊन येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com