Vidya Balan  Instagram @balanvidya
मनोरंजन बातम्या

Vidya Balan Birthday: १६ व्या वर्षी अभिनयाला सुरूवात, विद्या बालनला मिळाला होता 'अनलकी हिरोईन'चा टॅग

Vidya Balan Filmy Career: विद्या बालन आज कोट्यवधीची मालकीण असली तरी देखील तिने इथपर्यंत पोहचण्यासाठी खूपच संघर्ष केला आहे. विद्या बालनचा मोठा चाहतावर्ग असून ते नेहमी विद्याच्या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात.

Priya More

Vidya Balan Bday Special:

बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन (Vidhya Balan) आज आपला ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. विद्या बालनचा जन्म १ जानेवारी १९७९ ला तमिळ ब्राम्हण कुटुंबात झाला. विद्या बालने बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. विद्या बालनचा टीव्ही ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. आपल्या मेहनतीमुळे तिने टीव्ही इंडस्ट्री आणि बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली.

विद्या बालन आज कोट्यवधीची मालकीण असली तरी देखील तिने इथपर्यंत पोहचण्यासाठी खूपच संघर्ष केला आहे. विद्या बालनचा मोठा चाहतावर्ग असून ते नेहमी विद्याच्या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. विद्या बालनच्या वाढदिवसानिमित्त (Vidya Balan Birthday) आज आपण तिच्या फिल्मी करिअर आणि संघर्षाविषयी जाणून घेणार आहोत...

विद्या बालनला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अभिनय पार्श्वभूमी नसताना देखील विद्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.तिने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर निर्मित 'हम पांच' या टीव्ही शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या भूमिकेच्या माध्यमातून ती प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली. त्यानंतर तिने आपला मोर्चा सिनेसृष्टीकडे वळवला. टीव्ही मालिकांमध्ये काम करणं बंद करत तिने चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरूवात झाली.

विद्या बालनला चित्रपटांमध्ये खूप रस होता पण इंडस्ट्रीत नाव कमवण्यासाठी तिला खूप मेहनत करावी लागली. शिक्षण सुरू असतानाच विद्या बालनला तत्कालीन प्रतिष्ठित प्रकल्प 'चक्रम'मध्ये मल्याळम सुपरस्टार मोहनलालच्या विरुद्ध अभिनेत्रीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. तिने चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंगही पूर्ण केले होते. त्यानंतर अभिनेत्रीला जवळपास डझनभर चित्रपटांसाठी साइन करण्यात आले. पण प्रॉडक्शनच्या अडचणींमुळे 'चक्रम'चं पहिलं शेड्युल पुढे ढकललं गेलं आणि त्यानंतर विद्या बालनला इंडस्ट्रीत 'अनलकी हिरोईन'चा टॅग मिळाला.

फिल्मी करिअरची सुरूवात चांगली न झाल्यामुळे विद्या बालनला करिअरमध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. तरी देखील तिने हार मानली नाही. तिने आपले प्रयत्न सुरूच ठेवले आणि 2005 मध्ये 'परिणीता' चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. या चित्रपटातील जबरदस्त अभिनयाद्वारे विद्या बालनने प्रेक्षकांना वेड लावले.

विद्या बालनने बॉलिवूडला अनेक चांगले चित्रपट दिले. तिचे बरेच चित्रपट सुपरहिट देखील ठरले. पण विद्या बालनला तिच्या वाढत्या वजनामुळे इंडस्ट्रीतही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. विद्या बालनच्या 'कहानी', 'डर्टी पिक्चर', 'इश्कियां' आणि 'पा' यासारख्या चित्रपटांना प्रेक्षकांनी खूप चांगली पसंती दिली. तिचे हे चित्रपट सुपरहिट ठरले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT