Prathamesh Parab Wedding: प्रतिजाचं ठरलंय हा! प्रथमेश परबच्या केळवणाला सुरूवात; लग्नाची तारीखही आली समोर

Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar Wedding: प्रथमेश परबच्या घरी सध्या लगीनघाई सुरू झाली आहे. लवकरच तो त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. प्रथमेशच्या केळवणाला सुरूवात झाली असून त्याचे फोटो देखील समोर आले आहेत.
Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar
Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar Saam Tv
Published On

Prathamesh Parab:

२०२३ हे वर्ष मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांसाठी खूपच खास ठरले. यावर्षांत अनेकांनी लग्न करत नव्या आयुष्याला सुरूवात केली. आता २०२४ या नव्या वर्षाला सुरूवात झाली असून या वर्षात देखील आणखी एक मराठमोळा अभिनेता विवाहबंधात अडकणार आहे. तो अभिनेता म्हणजे ‘टाईमपास’ (Timepass Movie) या चित्रपटातील 'दगडू' अर्थात प्रथमेश परब (Prathamesh Parab). प्रथमेश परबच्या घरी सध्या लगीनघाई सुरू झाली आहे. लवकरच तो त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. प्रथमेशच्या केळवणाला सुरूवात झाली असून त्याचे फोटो देखील समोर आले आहेत.

'टाईमपास' चित्रपटामध्ये प्राजूचे प्रेम मिळवण्यासाठी दगडूने खूप प्रयत्न केले. या चित्रपटातील दगडू आणि प्राजूची लव्हस्टोरी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. काही दिवसांपूर्वीच प्रथमेशलाने त्याचा ३० वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या दिवशी त्याने रिअल लाइफमधील प्राजू मिळाली असल्याची गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्याने गर्लफ्रेंडसोबत बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. तेव्हापासून लवकरच प्रथमेश लग्न करणार असल्याचे बोलले जात होते. आता प्रथमेशच्या लग्नाच्या तयारीला देखील सुरूवात झाली आहे.

प्रथमेशने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर केळवणाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रथमेश आणि क्षितीजा केळवण करताना दिसत आहेत. दोघेही खूपच आनंदी दिसत आहेत. दोघांनी देखील मॅचिंग कलरचे कपडे परिधान केले आहेत. फोटोमध्ये कपलच्या मागे लाल रंगाचे फुगे लावलेले दिसत आहे. या फुग्यांवर केळवण असे मराठीमध्ये लिहिले आहे. हा फोटो शेअर करत प्रथमेश आणि क्षितीजाने सुंदर कॅप्शन देखील दिलं आहे.

Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar
Ketaki Chitale: त्या महापुरुषाचे म्हणणं काय आहे?, 2024 ला माझी इच्छा पूर्ण होणार का? असं म्हणत केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट

प्रथमेश आणि क्षितीजाने केळवणाचा फोटो शेअर करत कॅप्शन लिहीलंय की, '#प्रतिजाचं ठरलंय हा! बाकी तारीख लवकरच कळवतो.. (PS- तारीख खूपच Special आहे !, Hint caption मध्येच आहे. Comment मध्ये guess करा.) तोवर... नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. Happppppy "2024" प्रथमेश आणि क्षितीजाच्या पोस्टवरील कॅप्शन वाचून अनेकांनी ते १४ फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर लग्नबंधनात अडकणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar
थलापती विजयच्या 'The Greatest Of All Time'चा फर्स्ट लूक आऊट, 2024 मध्ये करणार डबल धमाका

दरम्यान, प्रथमेश परब गेल्या काही वर्षांपासून क्षितिजा घोसाळकरला डेट करत आहे. क्षीतिजा ही एक बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे. ती फॅशन डिझायनिंग सुद्धा करते. महत्वाचे म्हणजे ती प्रथमेशच्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रीमियरला आवर्जून उपस्थिती लावते. ती प्रथमेशला त्याच्या प्रत्येक कामात मदत करते. प्रथमेश आणि क्षीतिजा हे रिलेशनशिपमध्ये असल्याचे आता कन्फर्म झाले आहे. प्रथमेशला रिअल लाइफमध्ये प्राजू भेटल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar
John Abraham: जॉन अब्राहमने मुंबईमध्ये खरेदी केला आलिशान बंगला, किंमत ऐकून व्हाल थक्क

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com