Pulkit Samrat And Kriti Kharbanda Saam TV
मनोरंजन बातम्या

Pulkit Samrat And Kriti Kharbanda: ठरलं तर मग! क्रिती खरबंदा - पुलकित सम्राट मार्चमध्ये अडकणार विवाहबंधनात, तारीख आली समोर

Pulkit Samrat And Kriti Kharbanda Wedding Date: अभिनेत्री क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda) आणि पुलकित सम्राट (Pulkit Samrat) हे देखील लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.

Priya More

Pulkit Samrat And Kriti Kharbanda Wedding:

बॉलिवूडमध्ये (Bollywood) सध्या लग्नसराई सुरू आहे. एकापाठोपाठ एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याला सुरूवात करत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) येत्या २१ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यापाठोपाठ आता अभिनेत्री क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda) आणि पुलकित सम्राट (Pulkit Samrat) हे देखील लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.

बॉलिवूडमधील लाँग टाइम कपल म्हणून पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा या कपलकडे पाहिले जाते. गेल्या तीन ते चार वर्षांपासून हे कपल रिलेशनशिपमध्ये असून सध्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही राहत आहेत. बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आता हे कपल लग्न करणार आहे. काही दिवसांपूर्वी पुलकित आणि क्रितीने साखरपुडा केला होता. या कपलच्या साखरपुड्याचे काही फोटो व्हायरल देखील झाले होते. आता हे कपल लग्न करण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यांच्या लग्नाला आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

'माझ्या लग्नाला या' असे म्हणत क्रिती खरबंदाने बायफ्रेंड पुलकितसोबतचा फोटो शेअर करून मार्चमध्ये लग्न करणार असल्याचे संकेत दिले होते.अभिनेत्रीने लग्नाची तारख सांगितली नव्हती. पण आता या कपलच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, क्रिती आणि पुलकितच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. हे कपल मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाची तारीख १३ मार्च निश्चित करण्यात आली आहे. या कपलच्या लग्नाची तयारीही सुरू झाली आहे.

पुलकित आणि क्रितीच्या घरी सध्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. या कपलच्या लग्नाची तारीख फायनल झाली असली तरी देखील लग्नाचे ठिकाण अद्याप समजू शकले नाही. पुलकितची चुलत बहीण रिया लुथराने पुलकित आणि क्रितीच्या रोका सेरेमनीचा फोटो शेअर केला होता. यावेळी खरबंदा आणि सम्राट कुटुंब एकत्र दिसले होते. दरम्यान, 'पागलपंती' चित्रपटाच्या सेटवर पुलकित आणि क्रितीच्या लव्हस्टोरीला सुरूवात झाली. या सेटवरच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. हा चित्रपट २२ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT