Kangana Ranaut  Saam TV
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: पुरूषांना कशा मुली आवडतात?, कंगना रनौतने सांगितल्या लव्ह लाइफ टिप्स

Kangana Ranaut On Relationship: 'नात्यामध्ये दोन्ही बाजुंनी संतुलन असणे आवश्यक असते. महिलांनी त्याग करणे थांबवले तर अनेक नातेसंबंध संपुष्टात येतील.', असे मत कंगना रनौतने व्यक्त केले.

Priya More

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या बिधनास्त स्टाइल आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगना रनौत सध्या चर्चेत आली आहे त्यामागचे कारण म्हणजे तिने लव्ह लाइफबद्दल महत्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत. पुरूषांना नेमक्या कोणत्या प्रकारच्या मुली आवडतात याबद्दल कंगनाने आपले मत सांगितले आहे. 'नात्यामध्ये दोन्ही बाजुंनी संतुलन असणे आवश्यक असते. महिलांनी त्याग करणे थांबवले तर अनेक नातेसंबंध संपुष्टात येतील.', असे मत कंगना रनौतने व्यक्त केले.

पुरूषांमधील कोणत्या गोष्टी धोक्याचे चिन्ह मानल्या पाहिजे? या प्रश्नाचे उत्तर देताना कंगना रनौतने सांगितले की, 'पुरूषांना त्यांच्यापेक्षा हुशार, प्रतिभावान आणि यशस्वी महिला आवडत नाहीत. तर महिलांनाही स्वत:पेक्षा कमी यशस्वी आणि स्मार्ट पुरूष आवडत नाहीत.' तसंच, कंगनाने पुढे सांगितले की, 'जर तुम्ही प्रत्येक वेळी नातं टिकवण्याचा प्रयत्न करत असाल. तर हा एक मोठा लाल झेंडा आहे. जर दुसरी व्यक्ती ४० टक्के प्रयत्न करत असेल आणि तुम्ही ६० टक्के प्रयत्न करत असाल तर ते योग्य नाही. जर तुम्ही अधिक प्रामाणिक, सतर्क आणि निष्ठावान असाल तर ते नातं योग्यरित्या चालेल.'

कंगनाने असेही सांगितले की, 'मुलींसाठी दुसरा लाल झेंडा असा आहे की ज्यावर त्यांचा विश्वासही बसणार नाही. पण सत्य हे आहे की तुम्ही कितीही हुशार असला, कितीही यशस्वी झालात तरी पुरुषाला अशी मुलगी कधीच आवडणार नाही. त्याच्यापेक्षा अधिक यशस्वी किंवा प्रतिभावान कोण आहे? नातेसंबंधांमध्ये अशाच गोष्टी घडतात.' कंगनाने पुढे असेही सांगितले की, 'फक्त तिच्या बाबतीतच नाही तर इतरांच्या बाबतीतही तिने हे अनेकदा पाहिले आहे. हे काही अद्वितीय प्रकरणांमध्ये घडू शकत नाही. परंतु अन्यथा त्याला त्याच्यापेक्षा अधिक यशस्वी मुली आवडत नाहीत.'

कंगनाने आणखी एक महत्वाची गोष्ट सांगितली की, 'कधीकधी तिला वाटते की स्त्री त्याग करते म्हणून संसार व्यवस्थित चालतो. जर एखादा पुरुष स्त्रीपेक्षा हुशार नसेल तर तो तिला आवडत नाही का? या प्रश्नाचे उत्तर देताना कंगना रनौत सांगते की, 'अशा प्रकारचा पुरूष तिचा मित्र असू शकतो पण तिचा जोडीदार होऊ शकत नाही. एखाद्या पुरुषाला आदर मिळवण्यासाठी मुलीपेक्षा वरचढ असणे आवश्यक आहे.' याच कारणामुळे नात्यामध्ये जर एखादी व्यक्ती वेगाने पुढे जात असेल तर सर्वकाही बिघडते, असे कंगनाने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, ३ राष्ट्रीय महामार्गांवरील उपाययोजना ठरतील रामबाण

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

Raksha Bandhan 2025: भावाला चांदीची राखी बांधल्याने काय फायदे होतात?

Sangali : यंदा नागपंचमीला शिरळकरांना जिवंत नागाचे दर्शन | VIDEO

SCROLL FOR NEXT