Bastar The Naxal Story Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bastar The Naxal Story: अदा शर्माच्या 'बस्तर द नक्सल स्टोरी'चा टीझर आऊट, नीरजा माधवनच्या भूमिकेत नक्षलवाद्यांशी दोन हात करणार

Bastar The Naxal Story Teaser Out: 'बस्तर द नक्षल स्टोरी' (Bastar The Naxal Story Movie) हा चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. नुककात या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून सोशल मीडियावर त्याची चर्चा होत आहे.

Priya More

Adah Sharma Movie:

'द केरळ स्टोरी' (The Kerala Story Movie) या चित्रपटामुळे अभिनेत्री अदा शर्माला (Actress Adah Sharma) खूप चांगली प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटानंतर अदा शर्मा आता लवकरच आणखी एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे 'द केरळ स्टोरी'च्या यशानंतर निर्माता विपुल अमृतलाल शाह, दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि अभिनेत्री अदा शर्मा त्यांच्या पुढील चित्रपटासाठी पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांचा 'बस्तर द नक्षल स्टोरी' (Bastar The Naxal Story Movie) हा चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. नुककात या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून सोशल मीडियावर त्याची चर्चा होत आहे. अवघ्या काही तासांतच या टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

विपुल अमृतलाल शाह निर्मित आणि सुदीप्तो सेन दिग्दर्शित अदा शर्माच्या 'बस्तर द नक्सल स्टोरी' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. या चित्रपटाचा टीझर पाहून चाहत्यांच्या मनातील उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट येत्या 15 मार्च 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाच्या टीझरमध्ये अदा शर्मा म्हणते की, 'पाकिस्तानसोबतच्या चार युद्धात 8,738 जवान शहीद झाले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की, आपल्या देशात नक्षलवाद्यांनी 15 हजारांहून अधिक जवानांना मारले आहे. बस्तरमध्ये आमचे 76 सैनिकांना नक्षलवाद्यांनी क्रूरपणे ठार मारले आणि मग JNU मध्ये जल्लोष साजरा केला गेला. आपल्या देशातील एवढ्या प्रतिष्ठित विद्यापीठात आपल्या जवानांच्या हत्येवर जल्लोष केला जातोय. अशी विचारसरणी कुठून येते? बस्तरमध्ये भारताचे तुकडे करणारे हे नक्षलवादी हे षडयंत्र रचत आहेत. आणि मोठ्या शहरांमध्ये बसलेले डावे त्यांना साथ देत आहेत. मी या डाव्यांना रस्त्यावर उभे करून गोळ्या घालीन. त्यांना फाशी द्या.'

या चित्रपटात अदा शर्मा नीरजा माधवनच्या भूमिकेत दिसणार आहे. अदा शर्माने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये असे लिहिले की, 'निर्दोष लोकांच्या रक्ताने लाल रंगाची कथा! अनटोल्ड स्टोरी कॅप्चर करा... बस्तर - नक्षलवादी कथा. आता टीझर आऊट!' अदा शर्माच्या या चित्रपटाचे शूटिंग मागच्या वर्षी ऑक्टोबरपासून सुरू झाले होते. अवघ्या दोन महिन्यांत या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले. सनशाईन पिक्चर्सच्या बॅनरखाली अशिन ए. शाह यांची सहनिर्मिती असलेला हा चित्रपट आधी 5 एप्रिल 2024 रोजी रिलीज होणार होता. पण आता चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. हा चित्रपट आता 15 मार्च 2024 रोजी रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT