Vikrant Massey Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vikrant Massey Birthday: 6 हजार रुपयांमध्ये करिअरला सुरूवात, '12th Fail'मुळे मिळाली आयुष्याला कलाटणी

Vikrant Massey Filmy Career: मालिकेतून आपल्या करिअरची सुरूवात करणाऱ्या विक्रांतने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड आणि ओटीटीच्या जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

Priya More

Vikrant Massey Birthday Special:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) आज आपला ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. विक्रांत मेस्सीने टीव्ही मालिका, चित्रपट आणि आता वेबसीरिज अशा तिन्ही माध्यमांध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. विक्रांत मेस्सीला आज बॉलिवूडमध्ये वेगळ्या ओळखीची गरज नाही. आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून विक्रांत मेस्सी प्रेक्षकांचे मन जिंकतो.

मालिकेतून आपल्या करिअरची सुरूवात करणाऱ्या विक्रांतने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड आणि ओटीटीच्या जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली. विक्रांत मेस्सीचा फिल्मी प्रवास काही सोपा नव्हता. त्याच्या करिअरमध्ये अनेक अडथळे आले. पण या चढ-उतारावर त्याने मात केली. आज आपण विक्रांत मेस्सीच्या वाढदिवसानिमित्त त्याचे फिल्मी करिअरविषयी जाणून घेणार आहोत...

विक्रांत मेस्सीने टीव्हीपासून ते चित्रपट आणि आता ओटीटीपर्यंत आपल्या कामाची जादू दाखवली आहे. विक्रांत प्रत्येक प्रकारच्या पात्रात इतका गुंतून जातो की जेव्हा तो पडद्यावर येतो तेव्हा सर्वांचे मन जिंकतो. नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या '१२ वी फेल' चित्रपटामुळे त्याच्या करिअरला उंचावर नेऊन ठेवले. विक्रांतने या चित्रपटापूर्वी देखील अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या कामाचे देखील कौतुक झाले आहे. पण या चित्रपटाने त्याला पुन्हा खरी ओळख मिळवून दिली.

विक्रांत मेस्सी ऑऊटसाइडर्सपैकी आहे. त्याचा या क्षेत्राशी तसा काहीही संबंध नव्हता. त्यामुळे त्याचा हा प्रवास कठीण होता. विक्रांतने चित्रपटात काम करण्यापूर्वी डान्सचे प्रशिक्षण घेतले होते. 2007 मध्ये विक्रांत मेस्सीने एका डान्सिंग रिॲलिटी शोमध्येही भाग घेतला होता. मात्र या शोनंतर विक्रांतला फारशी ओळख मिळाली नाही. या शोनंतर विक्रांत 'धरम वीर', 'बालिका वधू' आणि 'गुमराह' सारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसला. यानंतर विक्रांतच्या हाती 'लुटेरा' चित्रपट लागला आणि त्याच्या फिल्मी करिअरला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली.

विक्रांत मेस्सी जेव्हा टीव्ही मालिकांमध्ये काम करत होता तेव्हा त्याला एका महिन्याला चार एपिसोड शूट करावे लागायचे आणि प्रत्येक एपिसोडसाठी त्याला ६ हजार रुपये मानधन दिले जात होते. विक्रांतने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, मी लगेचच कॅल्क्युलेशन केले आणि 24 हजार रुपये प्रति महिना या ऑफरला मी होकार दिला. ही ऑफर पैशासाठी नाही तर शिकण्याच्या इच्छेने स्वीकारल्याचे विक्रांतने सांगितले होते.

विक्रांत मॅसीने 'लुटेरा' चित्रपटानंतर अनेक चित्रपटात काम केले आहे. विक्रांत मेस्सीने दीपिका पदुकोणसोबत 'छपाक' या चित्रपटातही काम केले होते. या चित्रपटातील विक्रांतच्या कामाचेही खूप कौतुक झाले. याशिवाय विक्रांत मेस्सीला सर्वात लोकप्रिय वेब सीरिज 'मिर्झापूर'मधूनही विशेष ओळख मिळाली. ही वेबसीरिज हिट झाल्यानंतर विक्रांतच्या करिअरला दिशा मिळाली.

विक्रांतने 'लुटेरा', 'छपाक', 'गिन्नी वेड्स सनी', 'ब्रोकन बट ब्यूटीफुल', 'मेड इन हेवन', 'लव हॉस्टल', 'गॅसलाइट' आणि '१२ वी फेल' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचसोबत त्याने मिर्झापूरसोबत अनेक वेबसीरिजमध्ये देखील दमदार अभिनय केला आहे. विक्रांत मेस्सी लवकरच 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ३ मे रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT