Vicky Kaushal And Trupti Dimri  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vicky Kaushal आणि Trupti Dimri देणार 'बॅड न्यूज', नेमकं आहे तरी काय?

Bad Newz Movie Release Date: विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांची मुख्य भूमिका असलेल्या 'बॅड न्यूज' या चित्रपटाची नुकताच घोषणा करण्यात आली. विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांच्यासोबत एमी विर्क 'बॅड न्यूज' चित्रपटातही दिसणार आहे.

Priya More

Bad Newz Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार विकी कौशलचा (Vicky Kaushal) 'सॅम बहादूर' आणि तृप्ती डिमरीचा (Trupti Dimri) 'ॲनिमल' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकमेकांना टक्कर दिली. या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर यो दोघांच्या हातामध्ये नवीन चित्रपट येऊ लागले आहेत. 'ॲनिमल'मुळे तृप्ती डिमरीच्या करिअरला कलाटणी मिळाली. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले. त्यानंतर तृप्ती डिमरीला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या आहेत. अशाणध्ये आत विकी कौशल आणि तृप्ती डिमरी एकत्र 'बॅड न्यूज' (Bad Newz Movie) देणार आहेत. आता हे प्रकरण नेमकं आहे तर काय हे आपण जाणून घेणार आहोत...

विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांची मुख्य भूमिका असलेल्या 'बॅड न्यूज' या चित्रपटाची नुकताच घोषणा करण्यात आली. विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांच्यासोबत एमी विर्क 'बॅड न्यूज' चित्रपटातही दिसणार आहे. विकी कौशलने सोमवारी सोशल मीडिया अकाऊंटवरून ‘बॅड न्यूज’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली. यासोबतच चित्रपटाच्या रिलीज होण्याची तारीख देखील जाहिर करण्यात आली आहे. 'बॅड न्यूज' या चित्रपटाच्या घोषणेनंतर विकी कौशल आणि तृप्ती डिमरीचे चाहते खूपच उत्सुक दिसत आहेत.

विक्की कौशलने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क वेगवेगळ्या स्टाईलमध्ये एकत्र दिसत आहेत. यासोबतच विकी कौशलने त्याच्या नवीन चित्रपट 'बॅड न्यूज'ची घोषणा केली. विकी कौशलने या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ब्रेकिंग न्यूज: ही वाईट बातमी आहे! तुम्ही यासाठी तयार नाहीस... कारण आम्हीही तयार नव्हतो!' विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क यांचा चित्रपट 'बॅड न्यूज' 19 जुलै 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

विकी कौशलच्या या पोस्टमुळे त्याचे चाहते खूपच खूश झाले आहेत. त्याच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते त्याच्याला शुभेच्छा देत आहेत. विकीच्या एका चाहत्याने कमेंट्स करत लिहिले की, 'वाईट बातमी अशीच असेल तर चांगली बातमी कशी असेल.' दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, 'भाऊ वाट पाहतोय.' तिसऱ्या चाहत्याने लिहिले की, 'आणखी एक सुपरहिट लोड होत आहे.' तर आणखी एका चाहत्याने लिहिले की, 'आता मजा येईल.'

दरम्यान, विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क यांच्या 'बॅड न्यूज' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आनंद तिवारी यांच्याकडे आहे. शेवटी विकी कौशल शेवटचा 'सॅम बहादूर' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाशिवाय त्याच्याकडे 'लव्ह अँड वॉर', 'छावा' आणि 'मेरे मेहबूब मेरे सनम' हे चित्रपट आहेत. तर तृप्ती डिमरी शेवटी 'ॲनिमल' चित्रपटात दिसली होती. 'बॅड न्यूज' चित्रपटाव्यतिरिक्त तृप्ती डिमरी 'भूल भुलैया 3' चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT