Akshay Kumar Singham Again Look Saam Tv
मनोरंजन बातम्या

Singham Again: हातात मशीन गन अन् हेलिकॉप्टरमधून उडी, 'सिंघम अगेन'मध्ये अक्षय कुमारची धमाकेदार एन्ट्री

Singham Again New Photo: सूर्यवंशी म्हणजेच अक्षय कुमार देखील सिंगम अगेन चित्रपटात दिसणार असल्याचे निर्मात्यांनी जाहीर केलं.

Priya More

Akshay Kumar Singham Again Look:

बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार अजय देवगणच्या (Ajay Devgan) आगामी 'सिंघम अगेन' या चित्रपटाची (Singham Again Movie) प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रिकरण सध्या सुरू आहे. रोहित शेट्टीने काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या सेटवरून फोटो शेअर केले होते. ते फोटो पाहून हा चित्रपट खूपच जबरदस्त असणार असल्याचे दिसून आले होते.

आता निर्मात्यांनी आणखी एक जबरदस्त फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या माध्यमातून सूर्यवंशी म्हणजेच अक्षय कुमार देखील या चित्रपटात दिसणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं. या फोटोच्या माध्यमातून अक्षय कुमारची चित्रपटातील धमाकेदार एन्ट्री दाखवण्यात आली आहे. अभिनेता अक्षय कुमारने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या फोटोमध्ये वीर सूर्यवंशीच्या भूमिकेत सुपरस्टार अक्षय कुमार हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना सुपरस्टार अजय देवगणने कमेंट करत लिहिले की, 'नको म्हणालो होतो तरीही हेलिकॉप्टरने आला माझा मित्र सूर्यवंशी.' या फोटोनंतर स्वत: अक्षय कुमारनेही हा फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्याने असे लिहिले की, 'आला रे आला... सूर्यवंशी आला. एटीसी प्रमुख वीर सूर्यवंशी यांच्या प्रवेशाची वेळ झाली आहे. मग तुम्ही तयार आहात का?' असा प्रश्न अक्षयने चाहत्यांना केला आहे. अक्षय कुमार आणि अजय देवगणचा हा फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाला. ज्यावर लोक जोरदार कमेंट करत आहेत.

'सिंघम अगेन'मध्ये सुपरस्टार अक्षय कुमारच्या एन्ट्रीने रोहित शेट्टीचे पोलिस विश्व आणखी मोठे झाले आहे. रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सची सुरुवात अजय देवगणच्या 'सिंघम' चित्रपटाने झाली. या चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर अजय देवगण आणि रोहित शेट्टी पुन्हा एकदा 'सिंघम रिटर्न्स' घेऊन आला होता. यानंतर रोहित शेट्टीच्या 'सिम्बा' चित्रपटात रणवीर सिंगने जबरदस्त कॅमिओ केला होता. त्यानंतर रोहित शेट्टीचे पोलिस विश्व विस्तारावले. अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' सिनेमातही हा ट्रेंड कायम राहिला. आता या कॉप युनिव्हर्सचा पुढचा चित्रपट 'सिंघम अगेन' आहे. ज्यामध्ये दीपिका पदुकोण लेडी कॉपच्या भूमिकेत दिसणार आहे.

दरम्यान, हा फोटो पाहिल्यानंतर चित्रपटाबाबत दोघांच्याही चाहत्यांची उत्सुकता आताच शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी १५ ऑगस्ट २०२४ रोजी रिलीज करण्यात येणार आहे. रोहित शेट्टीचा कॉप युनिव्हर्सचा हा पुढचा पार्ट आहे. ज्यामध्ये सुपरस्टार अजय देवगणसोबत रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील दिसणार आहेत. आतापर्यंत समोर आलेले फोटोंवरून हा चित्रपट किती जबरदस्त असणार आहे याचा अंदाज येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Traitors Winner: उर्फी जावेद आणि निकिता लूथर ठरले 'द ट्रेटर्स'चे विजेते; ट्रॉफीसह मिळाणार कोट्यावधींचे बक्षीस

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Accident: नामकरण सोहळ्यावरून परतताना काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

चाँद नवाबनंतर आणखी एक पाकिस्तानी पत्रकार चर्चेत! समुद्राच्या खोलीचं रिपोर्टिंग करताना थेट समुद्रात मारली उडी

Dragan Fruit Farming : माळरानावर फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती; येवल्याच्या दुष्काळग्रस्त भागात यशस्वी प्रयोग

SCROLL FOR NEXT