मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अजय देवगण हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि नावाजलेला चेहरा आहे. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. कलाकारांनी एखाद्या वस्तूची जाहिरात केल्यावर चाहते त्या वस्तू वापरतात. अशात अजय देवगण सध्या त्याच्या ऑनलाइन गेमिंग अॅपमुळे वादाच्या विळख्यात सापडलाय.
अजय देवगणच्या या जाहिरातीमुळे नाशकात भीक मांगो आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनात एक व्यक्ती आपल्या दुचाकीवर बसलाय. त्याने हातात दोन बॅनर घेतलेत. एक बॅनर त्याने दुचाकीवर लावलंय. यावर त्याने अजय देवगणसाठी भीक मांगो आंदोलन! असं लिहिलंय. तसेच यावर फोन पे आणि गुगल पेचा क्रमांक देखील देण्यात आलाय.
नागरिकांना आपल्या आंदोलनाविषयी या व्यक्तीने एका माईकवर मोठ्या आवाजात माहिती दिलीये. त्याने म्हटलं आहे की, मी भीक मांगो आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलोय. हे पैसे मला अजय देवगणला द्यायचेत. त्याने ऑनलाइन गेमिंग अॅपची जाहिरात करणे थांबवावे.
अजयला पैसे हवे असतील तर मी त्याला ते भीक मागून देत आहे. मात्र हे पैसे देखील त्याला कमी पडले तर मी पुन्हा रस्त्यावर उतरत भीक मागेल. ही माझी गांधी स्टाईल विनंती आहे, असं या व्यक्तीने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.