Kartik Aaryan Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kartik Aaryan Birthday: कार्तिक आर्यनने 'कटोरी'सोबत साजरा केला वाढदिवस, क्यूट फोटो केला शेअर

Kartik Aaryan Birthday Celebration Photo: कार्तिक आर्यनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.

Priya More

Kartik Aaryan Celebrate Bday With Katori:

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आज आपला ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. कार्तिक आर्यनवर सध्या त्याच्या चाहत्यांकडून आणि सेलब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते कार्तिकला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देत आहेत.

कार्तिक आर्यनच्या वाढदिवसानिमित्त त्याचे चाहते ट्विटरवर ट्रेंड देखील चालवत आहेत. याचदरम्यान कार्तिक आर्यनने त्याच्या आयुष्यातील खास व्यक्तीसोबत वाढदिवस (Kartik Aaryan Birthday) साजरा केला. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कार्तिक आर्यनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. एकदम खास अंदाजमध्ये कार्तिक आर्यनने आपला वाढदिवस साजरा केला. या फोटोमध्ये कार्तिक आर्यनचा नवा लूक चाहत्यांना पाहायला मिळाला. त्याचा हा लूक सर्वांना प्रचंड आवडत आहे. या फोटोमध्ये कार्तिकसोबत कटोरी दिसत आहे. कार्तिकने यंदा कटोरीसोबत आपला वाढदिवस साजरा केला.

कार्तिकने बर्थडेनिमित्त शेअर केलेल्या फोटोमध्ये तो खूपच हँडसम दिसत आहे. कार्तिक क्लीन शेव्ड लूकमध्ये दिसत आहे. त्याने ब्लॅक कलरचा टी शर्ट आणि ट्रॅक पँट परिधान केली आहे. तसंच रेड कलरची कॅप घातली आहे. या फोटोमध्ये कार्तिक केक कापताना दिसत आहे. यावेळी कार्तिकसोबत त्याचा डॉग कटोरी देखील दिसत आहे. कार्तिकने कटोरीसोबत वाढदिवस साजरा केला. हा फोटो शेअर करत कार्तिकने कॅप्शनमध्ये 'तुम्हा सर्वांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद.' असे लिहिले आहे.

कार्तिक आर्यनचा हो फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचसोबत कार्तिकच्या चाहत्यांसोबत सेलिब्रिटींनी या पोस्टवर कमेंट्स करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, कार्तिक आर्यन लकवरच त्याचा आगामी चित्रपट 'चंदू चँपियन'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासोबतच तो 'भूल भुलैया 3', आणि 'कॅप्टन इंडिया' या चित्रपटांमध्ये देखील काम करताना दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT