John Abraham  Saam Tv
मनोरंजन बातम्या

John Abraham: जॉन अब्राहमने मुंबईमध्ये खरेदी केला आलिशान बंगला, किंमत ऐकून व्हाल थक्क

John Abraham Buy New Bungalow: जॉनने खार परिसरामध्ये ज्याठिकाणी नवा बंगला खरेदी केला आहे त्या परिसरामध्ये बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान आणि अभिनेत्री प्रिती झिंटा यांचे देखील घर आहे.

Priya More

John Abraham Bungalow:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) सध्या चर्चेत आला आहे. यामागचे कारण म्हणजे जॉन अब्राहमने मुंबईतल्या पॉश एरियामध्ये आलिशान बंगला खरेदी केला आहे. जॉनने खार परिसरात ७५ कोटी रुपयांचा बंगला (John Abraham Bunglow) खरेदी केला आहे. याच परिसरामध्ये बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान आणि अभिनेत्री प्रिती झिंटा यांचे देखील घर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जॉन अब्राहमने नुकताच मुंबईत नवं घर खरेदी केलं आहे. जॉनने मुंबईतील खार परिसरातील लिंकिंग रोडवर ७५.०७ कोटी रुपयांना बंगला खरेदी केला आहे. निर्मल भवन नावाचा हा बंगला सुमारे ७,७२२ स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. त्यापैकी ५,४१६ स्क्वेअर फूट जागेत बंगला बांधण्यात आला आहे. जॉनने हा बंगला प्रवीण नथालाल शाह आणि इतरांकडून खरेदी केली आहे.

प्रॉपर्टी कन्सल्टेंट कंपनी इंडेक्स टॅप डॉट कॉमनुसार, जॉनने समुद्र किनाऱ्याजवळील मालमत्तेसाठी ४.२४ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरले आहे. २७ डिसेंबर रोजी जॉनने या प्रॉपर्टीची नोंदणी केली. जॉनने अद्याप या बंगल्या बाबतची माहिती शेअर केली नाही. जॉनकडे आधीच वांद्रे येथे एक आलिशान अपार्टमेंट आहे. दोन फ्लॅट्स एकत्र करून दोन मजल्यांवर त्यांने हे घर डिझाइन केले आहे. त्याच्या या अपार्टमेंटला सी व्ह्यूव टेरेस देखील आहे.

जॉन अब्राहम हा बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी असा एक आहे ज्यांनी रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. 2009 मध्ये त्यांनी रतनश या पारशी कुटुंबाकडून पेटिट शाळेजवळील युनियन पार्कमध्ये एक मुख्य भूखंड खरेदी केला होता. दरम्यान, वांद्रे, खार परिसरात सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आणि उद्योगपती राहतात. या परिसरामध्ये आपले घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. या परिसरामध्ये घर 1 लाख ते 1.50 लाख रुपये प्रति चौरस फूट दराने विकली जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पारा घसरला, मुंबई-पुण्यासह राज्यात थंडीची लाट

Delhi Car Blast : उमरने कारसह स्वत:ला उडवले, दिल्ली ब्लास्टचा न पाहिलेला व्हिडिओ समोर, अयोध्याही होतं दहशतवाद्याचे टार्गेट

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत eKYC साठी मुदतवाढ देणार, आदिती तटकरेंची मोठी घोषणा

Bus Crash: प्रवासी बस २०० मीटर दरीत कोसळली, ३७ जणांचा मृत्यू, २४ जखमी; पेरूमध्ये भयंकर अपघात

Success Story: अभिमानास्पद! माढ्याच्या ४ सुपुत्रांची उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती; प्रेरणादायी प्रवास वाचा

SCROLL FOR NEXT