Fighter Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Fighter Movie: हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या 'फायटर'ला सेन्सॉर बोर्डाने लावली कात्री, या सीन्सवर घेतला आक्षेप

Hrithik Roshan And Deepika Padukone: फायटर चित्रपटाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. या चित्रपटातील काही सीन्सवर सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे. त्यामुळे काही सीन्स बदलून हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे.

Priya More

Fighter Movie Scenes Cut By Censor Board:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या त्याच्या आगामी 'फायटर' चित्रपटामुळे (Fighter Movie) चांगलाच चर्चेत आहे. हृतिकचा हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला रिलीज होणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटामध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर हे मुख्य भूमिकेमध्ये आहेत.

या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना भरपूर प्रमाणात एरियल अ‍ॅक्शन आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक हा चित्रपट रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशामध्ये आता फायटर चित्रपटाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. या चित्रपटातील काही सीन्सवर सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे. त्यामुळे काही सीन्स बदलून हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे.

सेन्सॉर बोर्डाने हृतिक-दीपिकाच्या चित्रपटाला ग्रीन सिग्नल दिला आहे. पण सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील काही सीन्सला कात्री लावली. त्यानंतर CBFC ने चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सेन्सॉर बोर्डाने हृतिक रोशन फायटर आणि दीपिका पदुकोणच्या चित्रपटाला ग्रीन सिग्नल देण्यापूर्वी काही सीन्स काढून टाकण्यास सांगितले आहेत. फायटरमधून अश्लील शब्द काढण्यात आल्याचे बोलले जात आहे. हा शब्द दोन संवादांमध्ये निःशब्द किंवा बदलला गेला आहे.

रिपोर्ट्सनुसार, हा शब्द 53व्या मिनिटाला होता. तर दुसरा शब्द 18व्या मिनिटाला होता. अश्लील शब्दांव्यतिरिक्त, चित्रपटात हिंदी भाषेत धूम्रपानविरोधी संदेश देखील दाखवण्यास सांगितले आहे. तिसरा बदल लैंगिकदृष्ट्या सुचविलेल्या व्हिज्युअलमध्ये आहे आणि चौथा बदल टीव्ही न्यूज व्हिज्युअलमध्ये आहे. अशाप्रकारचे काही बदल सेन्सॉर बोर्डाकडून फायटर चित्रपटाच्या टीमला सूचवण्यात आले आहेत.

फायटर चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून U/A प्रमाणपत्र मिळाले आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित चित्रपटाचा रन टाइम 2 तास 40 मिनिटांच्या आत असल्याचे बोलले जात आहे. सेन्सॉर बोर्डाकडून कट आणि चित्रपटाच्या रनटाइमबद्दल निर्मात्यांकडून कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेले नाही. हृतिक आणि दीपिकाचा फायटर चित्रपट अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये देखील चांगली कमाई करत आहे. सकनिल्‍कच्‍या अहवालानुसार, फायटरची ओपनिंग डेसाठी जवळपास 60 हजार तिकिटे विकली गेली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT