मनोरंजन बातम्या

Arjun Rampal ची मुलगी Mahikaa झाली इतकी मोठी, 'Jio World Plaza'च्या लॉन्च इव्हेंटला बायफ्रेंडसोबत लावली हजेरी

Mahikaa Rampal Video: या कार्यक्रमात संपूर्ण लाइमलाइट अर्जुन रामपालची (Arjun Rampal) मुलगी माहिका रामपालने (Mahikaa Rampal) खाल्लं.

Priya More

Jio World Plaza:

'जिओ वर्ल्ड प्लाझा'च्या (Jio World Plaza) लक्झरी मॉलचा उद्घाटन सोहळा मंगळवारी पार पडला. हा मॉल आजपासून सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे. अंबानी कुटुंबाच्या या कार्यक्रमात बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. आपल्या दमदार ड्रेसिंग स्टाईल आणि सौंदर्याने या बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला चार चाँद लावले.

या कार्यक्रमात सलमान खान (Salman Khan), रणवीर कपूर (Ranveer Singh), आलिया भट्ट (Alia Bhatt), प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra), सोनम कपूर (Sonam Kapoor), अर्जुन कपूर (Arjun Kapoor), मलायका अरोरा (Malaika Arora), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) या सेलिब्रिटींनी आपली जादू दाखवली. या सेलिब्रिटींकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. पण या कार्यक्रमात संपूर्ण लाइमलाइट अर्जुन रामपालची (Arjun Rampal) मुलगी माहिका रामपालने (Mahikaa Rampal) खाल्लं.

माहिका रामपालला रेड कार्पेटवर पाहून तिच्या चाहत्यांसह सर्वजण आश्चर्यचकित झाले. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अनेकांना तिला ओळखताच आले नाही. काही जण तिला रिया कपूर म्हणत आहेत. तर अनेकजण तिची तुलना पलक तिवारीशी करत आहेत.

अर्जुन रामपालची मोठी मुलगी माहिका रामपाल तिच्या रूमर्ड बॉयफ्रेंड वेदांत महाजनसोबत 'जिओ वर्ल्ड प्लाझा' कार्यक्रमात पोहोचली होती. यावेळी ती निळ्या रंगाच्या थाई हाय लिस्ट गाऊनमध्ये दिसली. तर वेदांतही ब्लू आणि ब्लॅक आउटफिटमध्ये दिसला. दोघांनीही मीडियासमोर जबरदस्त पोझ देखील दिल्या. या दोघांनी या कर्यक्रमाला एकत्र हजेरी लावल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या सोशल मीडियावर तिचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. नेटिझन्स विचारत आहेत की, ती अचानक इतकी मोठी कधी झाली? एका यूजरने आश्चर्याने विचारले, 'ही अर्जुन रामपालची मुलगी आहे का? दुसर्‍याने लिहिले की,'अचानक इतकी मोठी कधी झाली? तिसर्‍या यूजरने लिहिले की,'जोपर्यंत मी कॅप्शन वाचत नाही तोपर्यंत मला वाटले की तो सिद्धांत चतुर्वेदी आणि पलक तिवारी आहेत.' तर अनेक यूजर्सनी कमेंट्समध्ये लिहिले की, रिया कपूरसारखी दिसते.

माहिका ही अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिया यांची मोठी मुलगी आहे. जी २१ वर्षांची आहे. अभिनेता अनेकदा आपल्या मुलींसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. माहिका लंडनमधील एका फिल्म स्कूलमध्ये शिकत आहे. त्यामुळे ती वडिलांप्रमाणे लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार यात काही शंका नाही.

माहिकाचा रूमर्ड बॉयफ्रेंड वेदांत महाजन हा व्यावसायिक आहेत. त्याचे नाव यापूर्वी काजोल आणि अजय देवगणची मुलगी नासा देवगणसोबत जोडले गेले होते. वेदांत महाजन हा २५ वर्षीय उद्योजक आहे. जो त्याच्या मित्र माणक धिंग्रा आणि मोहित रावल यांच्यासोबत इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी MVM Entertainment चा सह-मालक आहे. वेदांत त्याच्या मित्रांसोबत दिल्ली, मुंबई आणि लंडनमध्ये मोठ्या पार्टीचे आयोजन करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

SCROLL FOR NEXT