Anil Kapoor's Nayak Movie Sequel Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nayak 2 Movie: अनिल कपूर पुन्हा बनणार एक दिवसाचा मुख्यमंत्री?, २३ वर्षांनंतर येतोय 'नायक'चा सीक्वल

Anil Kapoor's Nayak 2 Movie: सिद्धार्थ आनंद आणि ममता आनंद यांच्या मार्फिक्स पिक्चर्सच्या बॅनरखाली 'नायक २' चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे आहेत. तर मिलन लुथरिया या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

Priya More

Anil Kapoor Starrer Nayak Movie Sequel:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अनिल कपूरचा 'नायक' चित्रपट (Nayak Film) आजही प्रत्येकाला आठवत असेल. या चित्रपटामध्ये अनिल कपूरने एक दिवसाच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाची कथा आणि अनिल कपूरच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली होती. या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यात यश आले नव्हते. अशातच २३ वर्षांनंतर आता नायक चित्रपटाचा सीक्वेल येत आहे. 'नायक २' चित्रपट (Nayak 2 Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याची घोषणा करण्यात आली आहे.

पिंकविलाने दिलेल्या रिपोर्टनुसार, सिद्धार्थ आनंद आणि ममता आनंद यांच्या मार्फिक्स पिक्चर्सच्या बॅनरखाली 'नायक २' चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे आहेत. तर मिलन लुथरिया या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. हा चित्रपट देखील राकारणावर आधारित असणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगसाठीची जागा देखील फायनल झाली आहे. पण अद्याप चित्रपटामधील कलाकारांची कास्टिंक सुरू आहे. या चित्रपटामध्ये नेमके कोण-कोणते कलाकार काम करणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

मिनल लुथरियाने याआधी 'द डर्टी पिक्चर', 'कच्चे धागे', 'टॅक्सी नंबर 9211' आणि 'वन्स अपॉन ए टाइम' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे. दरम्यान, 'नायक: द रियल हिरो' हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. रजनीकांतच्या 'शिवाजी: द बॉस'सारखे हिट चित्रपट बनवणाऱ्या एस शंकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तर एएम रत्नम हे या चित्रपटाचे निर्माता होते. त्यांनी श्री सूर्या मुव्हीजच्या बॅनरखाली त्याची निर्मिती केली होती. या चित्रपटामध्ये अनिल कपूर, राणी मुखर्जी, अमरीश पुरी, परेश रावल, जॉनी लीव्हर आणि शिवाजी साटम हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत होते.

नायक चित्रपटामध्ये अमरीश पुरी यांनी मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारली होती आणि अनिल कपूर पत्रकाराच्या भूमिकेत दिसला होता. त्यानंतर तो एक दिवसाचा मुख्यमंत्री बनतो. या चित्रपटाची स्टोरी खूपच अप्रतिम आहे. या चित्रपटाला टीव्हीवर चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. पण थिएटरमध्ये हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. २१ कोटीं रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त १०.७५ कोटींची कमाई केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News : मोठी बातमी! नाशिकमध्ये ५ कोटींचं घबाड सापडलं, नेत्यासह गाडीही जप्त

Maharashtra News Live Updates: पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Night Skin Care: झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा किचनमधील 'या' गोष्टी; सकाळी मोत्याप्रमाणे चमकेल चेहरा

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

SCROLL FOR NEXT