Sara Ali Khan On Trollers: टीका करणाऱ्या चाहत्यांवर भडकली सारा, म्हणाली, “मला मूर्ख, चुकीचं…”

Sara Ali Khan News: नुकतंच साराने एका मुलाखतीमध्ये तिच्या साधाभोळा स्वभावावर भाष्य केलंय. तिचा हा स्वभाव तिच्या चाहत्यांना कायम भावतो. पण, अनेकदा तिला त्यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
Sara Ali Khan On Trollers
Sara Ali Khan On TrollersInstagram

Sara Ali Khan On Trollers

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानच्या 'ए वतन मेरे वतन' चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. साराचा हा चित्रपट आज 'ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत असून साराच्या अभिनयाची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. (Bollywood)

सध्या सारा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतंच तिने एका मुलाखतीमध्ये, तिच्या साधाभोळा स्वभावावर भाष्य केलंय. तिचा हा स्वभाव तिच्या चाहत्यांना कायम भावतो. पण, अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत साराने याबाबत भाष्य केलं आहे. (Bollywood Actress)

Sara Ali Khan On Trollers
Kapkapiii Motion Poster: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूरच्या नव्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज, 'कपकपी' पाहून प्रेक्षकांमध्ये होणार हास्यकल्लोळ

नुकतंच सारा अली खान दिलेल्या मुलाखतीध्ये म्हणाली की, "जर प्रेक्षकांनी माझ्या अभिनयावर भाष्य केलं तर, तर त्याचा निश्चितच माझ्यावर फरक पडतो. याउलट लोकं जर माझ्या व्यक्तिमत्त्वाबद्दल भाष्य करत असतील, तर मी त्याकडे फारसे लक्ष देत नाही. त्याचा मला कोणताही फरक पडत नाही. मी खूप हसत-खेळत सर्वांचं मनोरंजन करायला जाते, आणि त्याच गोष्टीमुळे अनेकजण माझ्यात नकारात्मकतेने पाहतात. माझ्या स्वभावामुळे अनेकजणं मला मूर्ख आणि चुकीचं समजतात, माझा स्वभाव पाहून त्यांना वाटतं की, मी माझ्या आयुष्यात काही करू शकत नाही. पण, माझा स्वभावच तसा आहे." (Bollywood Film)

"माझे मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीय मला खूप चांगलं ओळखतात. ते माझा गंभीर आणि विनोदी स्वभाव नेहमीच समजून घेतात. खरंतर, सगळेच असा विचार करत नाहीत. काही लोक कधी-कधी ‘ही जोकर आहे, गंभीर कामं कशी करू शकते’ असा समज करून घेतात. माझ्या खासगी आयुष्याबद्दल जर कोणी बोलत असेल तर मला त्याचा खरंच फरक पडत नाही. कारण माझं खासगी आयुष्य पूर्णत: वेगळं आहे. मला काय त्यांच्याशी लग्न करायचं नाहीये." (Bollywood News)

Sara Ali Khan On Trollers
'Do Aur Do Pyaar'चा Teaser Out; विद्या- प्रतिकच्या मॉडर्न लव्हस्टोरीने वेधले लक्ष

सारा अली खानच्या कामाबद्दल बोलायचे तर, तिचा ‘ए वतन मेरे वतन’ हा चित्रपट येत्या २१ मार्चला 'ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. (Entertainment News)

Sara Ali Khan On Trollers
Earthquake Ss Rajamouli: भूकंपातून राजामौली थोडक्यात बचावले; मुलगा कार्तिकेयने पोस्ट करत सांगितला अंगावर शहारे आणणारा किस्सा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com