कार्तिक आर्यन अभिनित ‘चंदु चॅम्पियन’ चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने कमी कमाई केल्यानंतर रविवारी तिसऱ्या दिवशी दमदार कमाई केलेली पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे कथानक पॅरालिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांच्यावर आधारित आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दिलासादायक कमाई करीत असून चित्रपटाच्या कमाईमध्ये तिसऱ्या दिवशी वाढ झालेली आहे. जाणून घेऊया चित्रपटाच्या कमाईबद्दल
पॅरालिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांच्या ‘चंदू चॅम्पियन’ ची गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत कार्तिक आर्यन असून चित्रपटामध्ये, गोल्ड मेडलिस्ट मुरलीकांत पेटकर यांची भूमिका त्याने स्विकारली आहे. या बायोपिकमध्ये, मुरलीकांत यांचा एक सैनिक आणि बॉक्सर होण्यापासून ते गंभीर दुखापतीतून बरा झाल्यानंतर जलतरणपटू होण्यापर्यंतचा थक्क करणारा प्रवास दाखवण्यात आला आहे. ही सर्व किमया दिग्दर्शक कबीर खान यांनी दाखवली आहे. चित्रपटाची फक्त देशातच नाही तर, परदेशातही जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाने देशात तीन दिवसांत २२ कोटींची कमाई केलेली आहे.
सॅकनिल्क ट्रेड ॲनालिस्टने दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक आर्यनच्या या बहुचर्चित चित्रपटाने पहिल्या दिवशी ४.७५ कोटी, दुसऱ्या दिवशी ६.७५ कोटी तर तिसऱ्या दिवशी १० कोटी रुपये कमावले आहेत.. चित्रपटाच्या कमाईचे प्रारंभिक आकडे आहेत. अधिकृत आकडेवारी आल्यानंतर त्यात थोडे बदल होऊ शकतात. चित्रपटाने देशात तीन दिवसांत २२ कोटींची कमाई केलेली आहे. तर जगभरामध्ये २६ ते २७ कोटींच्या आसपासची कमाई केलेली आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाची निर्मिती १४० कोटींमध्ये केलेली असून निर्मात्यांना निर्मितीचा खर्च वसूल करण्यासाठी बरीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाची कथा सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. पेटकर यांनी १९७० साली कॉमनवेल्थ गेम्समध्ये आणि त्यानंतर १९७२ साली जर्मनीमध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशाचं नाव उज्वल केलं होतं. चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करीत असून चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला आणि कबीर खान यांनी केली आहे. चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत भुवन अरोरा, राजपाल यादव, यशपाल शर्मा, विजय राज, अनिरुद्ध दवे, पलक लालवानी आणि इतर कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.