The Sabarmati Report Announcement Instagram
मनोरंजन बातम्या

The Sabarmati Report Announcement: विक्रांत मेस्सीचा नवा चित्रपट, '12 वी फेल' नंतर 'द साबरमती रिपोर्ट' मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

The Sabarmati Report: '१२वी फेल'नंतर अभिनेता विक्रांत मेस्सी नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Chetan Bodke

The Sabarmati Report Announcement

'१२वी फेल' (12th Fail) चित्रपटामुळे बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) बराच चर्चेत आला आहे. '१२वी फेल' चित्रपटामध्ये विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेमध्ये होता. त्याच्या अभिनयाचं सध्या सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे.

आता '१२वी फेल'नंतर अभिनेता विक्रांत मेस्सी नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकता कपूर निर्मित 'द साबरमती रिपोर्ट' (The Sabarmati Report) या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटातून विक्रांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बालाजी मोशन पिक्चरच्या इन्स्टाग्राम पेजवरुन ही घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटाचा मोशन पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी या पॉलिटिकल थ्रिलर ड्रामाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. विक्रांतसोबत चित्रपटामध्ये, राशी खन्ना आणि रिद्धी डोगराही दिसणार आहे. 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट ३ मे २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रंजन चंदेल यांनी केले आहे. (Bollywood Film)

अभिनेता विक्रांत मेस्सीने चित्रपटाचा मोशन पोस्टर शेअर केला आहे. पोस्टर शेअर करताना कॅप्शन दिले की, "माहित नसलेल्या कथेचा इतिहास उलगडण्यासाठी तयार राहा. 'द साबरमती रिपोर्ट - 2002'च्या घटनेचा एक प्रवास ज्याने संपूर्ण देशावर कधी न मिटणारी छाप सोडली!" (Bollywood Actor)

एकता कपूर निर्मित 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. २७ फेब्रुवारी २००२ रोजी गुजरात राज्यामध्ये झालेल्या गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्सप्रेसमध्ये घडलेल्या भीषण घटनेवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अन्यथा दसरा मेळाव्याला मोठा निर्णय घ्यावा लागेल- मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

Ashwini Kedari: PSI मध्ये मुलींमध्ये पहिली, IAS होण्याचं स्वप्न पण अश्विनी केदारींवर काळाचा घाला, अवघ्या ३०व्या वर्षी मृत्यू

सचिन तेंडुलकर बीसीसीआयचा अध्यक्ष होणार? कारणही आले समोर आले

गर्ल्स हॉस्टेल बनलं देहविक्रीचा अड्डा; व्हॉट्सअ‍ॅपवर डील अन् मोठी रक्कम, १० तरूणींसह ११ जण ताब्यात

Pitrupaksha 2025: पितृपक्षात सोमवारी करा हे खास उपाय, पूर्वजांचा मिळेल आशिर्वाद

SCROLL FOR NEXT