आपण ज्यावेळी रस्त्यांवर प्रवास करतो, त्यावेळी रस्त्याच्या कडेला 'वाहने हळू चालवा, प्राण्यांचा जीव वाचवा' असे बोर्ड लिहिलेले आपण वाचतो. अनेकजण गाडी चालवताना आपली सतर्कता दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. अशीच सतर्कता एका मराठमोळ्या अभिनेत्याने दाखवली आहे. तो दुसरा तिसरा कोणीही नसून 'बिग बॉस मराठी ३' फेम अभिनेता उत्कर्ष शिंदेने एका मुक्या प्राण्याचा जीव वाचला आहे. त्याने मुक्या प्राण्याचा जीव वाचवत असतानाचा इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. (Marathi Actors)
उत्कर्ष शिंदे कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावर अभिनेत्याने एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेता आपल्या पोस्टमध्ये बोलतो, “ ‘फायटर’ वर ‘संक्रांत आली होती का?’ माहिती नाही पण “संकट नक्कीच आल होतं...” छत्रपती संभाजीनगरमध्ये सामाजिक रित्या माझा वाढदिवस साजरा करुन भल्या पहाटे मुंबईसाठी परत निघालो. गरमा गरम हुरडा खात, गार वारा कापत प्रवास सुरु होता. हायवेवर एका मागोमाग भरदाव वेगाने वाहने धावत होती आणि तितक्यात नगर येता येता रस्त्याच्या मधो मध दिसला एक चिमुकला “फायटर” एका पायाने लंगडत हायवेवर त्याच्या आईला शोधत सैरावैरा जिवाच्या आकांताने मधोमध पळणार घाबरलेल वाट विसरलेलं एक चिमुकल कुत्र्याचं पिल्लू. ” (Bigg Boss Marathi)
मुक्या प्राण्याचा जीव वाचवत असतानाचा अनुभव शेअर करताना अभिनेता पुढे बोलतो, “आमच्या गाडीसमोर “फायटर” दिसताच आम्ही कार कशी बशी कंट्रोल करत रस्त्याच्याकडेला थांबवली. खरा काऊंटडाऊन सुरू झाला होता तो तेव्हाच. भीती होती ती आता मागून दुसऱ्या कोणत्या तरी गाडी खाली त्याचा जीव जाऊ नये ह्याची. तसाच गाडीतून मी उतरुन उलट हायवेवर धावत रस्त्याच्या मधोमध “फायटर”च्या मदतीस पोहोचलो. त्याला उचललं. पाहिलं तर एका पायाला जखम असल्याने तो लंगडत होता. विचार केला ह्याची आईजवळ आसपास असेल. ह्याला इथेच झाडात सोडू, म्हणजे हा सुखरुप राहील. पण का जाणे ते पिल्लू केविलवाण्या नजरेन बघू लागलं.” (Social Media)
“एक क्षण विचार केला आणि पुन्हा त्या पिल्लाला उचललं आणि गाडीत सोबत घेऊन आलो. त्याला दुसरं कुठे लागलं नाहीना? चेक करत करत. तो भूकेला असेल तहानेजला असेल आधी ह्याला एनर्जी मिळावी म्हणजे हा स्थिर होईल ह्या विचाराने. त्या पिल्लाला घेऊन पुढे एका धाब्यावर थांबलो त्याला पाणी पाजलं- बिस्कीट खाऊ घातलं, त्याच्या पायाला औषध लावालं. आणि काही काळ आम्ही गूळाचा चहा घेत तिथे थांबलो. तेथील काही चाहत्यांनी सेल्फी घेतली. काहींनी त्या पिल्लाबद्दल विचारपुस केली. मांडीत बसलेला जखमी पिल्लू पाहून तेथील एकाने मी हे पिल्लू घेऊ का? मी त्याचा संभाळ करतो सर म्हणत मायेने त्याला जवळ घेतलं आणि त्याची पुढील जबाबदारी घेतली..”
“आणि मनात विचार आला.आता हे पिल्लू जगेल पुढच्या कैक संक्रांती बघण्यासाठी. आजच्या ह्या संकटाला हरवून एका “फायटर” सारखा. निरोप घेतला निघालो पण या घटनेतून मी एक गोष्ट नक्कीच शिकलो. मी का बर हे टेन्शन मागे लाऊन घेऊ? माझं थोडीच हे काम आहे? मला काय गरज? आपण बऱ्याचदा हे विसरून जातो की आपल्या छोट्याश्या मदतीने कोणावर ओढावणारी वाईट गोष्ट टळू शकते. इट्स अ सर्कल. तुम्ही मदत करा कोणाची तरी तुमची मद्दत करायला नक्कीच कोणीनं कोणी येईलच.आज तील गूळ देऊन फक्त वरूनगोड गोड बोलायचं नाही तर जिथे जाऊ तिथे गोडवा पसरवायचा प्रयत्न करायचा..” अभिनेत्याने एका मुकप्राण्याचा जीव वाचवल्यामुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी अभिनेत्याने चाहत्यांनाही सोशल मीडियावर गरजूंना मदत करण्याचे आव्हान केले. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.