Jr NTR And Janhvi Kapoor Dheere Dheere Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jr NTR आणि Janhvi Kapoor च्या Devara मधील रोमँटिक गाणं रिलीज, गाण्याची सोशल मीडियावर चर्चा

Dheere Dheere Song Out : 'उलझ' चित्रपटानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर एका टॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'देवरा : पार्ट १' या चित्रपटातून जान्हवी टॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

Chetan Bodke

'उलझ' चित्रपटानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर एका टॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'देवरा : पार्ट १' या चित्रपटातून जान्हवी टॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. तिच्यासोबत ज्यु. एनटीआर ही दिसणार आहे. नुकतंच 'देवरा : पार्ट १'मधील एक नवं गाणं सोशल मीडियावर रिलीज झाले आहे. या रोमँटिक गाण्यात जान्हवी आणि ज्यु. एनटीआर एकत्र दिसणार आहे. 'धीरे धीरे' असं या रोमँटिक साँगचं नावं असून जान्हवी आणि ज्यु. एनटीआरचा रोमान्स या गाण्यात तुम्हाला पाहायला मिळेल.

या गाण्यात ज्यु. एनटीआर आणि जान्हवीची एक सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. तसंच दोघांच्या रोमँटिक डान्सनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शेअर केलेल्या ह्या नव्या गाण्यात जान्हवीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. अवघ्या काही तासांतच या गाण्याला युट्यूबर मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले असून नेटकऱ्यांमध्ये गाण्याची जोरदार चर्चा होत आहे. १४ वर्षे लहान असलेल्या जान्हवीसोबत ज्यु. एनटीआर रोमान्स करत असल्यामुळे अनेक चाहते अभिनेत्याला ट्रोल करीत आहेत. पण असं असलं तरीही जान्हवी आणि ज्यु. एनटीआरची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

‘धीरे-धीरे’ गाण्याबद्दल सांगायचे तर, हे गाणं संगीतबद्ध प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांनी केलं आहे. तर शिल्पा रावने या गाण्याला आवाज दिला आहे. तर कौसर मुनीर या गाण्याचे गीतकार आहेत. ‘बँग बँग’, ‘तौबा तौबा’ सारख्या सुपरहिट गाण्यांचे नृत्यदिग्दर्शक बॉस्को मार्टिसने ‘धीरे-धीरे’ गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून प्रेक्षक दोघांनाही एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहे. युट्यूबवर हे गाणं तुफान व्हायरल होत असून कोट्यवधी व्ह्यूज ह्या गाण्याला आतापर्यंत मिळाले आहे.

'देवरा' हा पॅन इंडिया अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. कोरटाला सिवा लिखित आणि दिग्दर्शित, 'देवरा' मध्ये जूनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहे. सैफ अली खान मुख्य खलनायकाच्या भूमिकेत आहे. यात बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरही मुख्य भूमिकेत आहे.

जान्हवीही 'देवरा'चित्रपटाच्या माध्यमातून साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. प्रकाश राज, श्रीकांत, शाइन टॉम चाको, नारायण, कलाईरासन, मुरली शर्मा आणि अभिमन्यू सिंग हे देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

‘देवरा: पार्ट १’ हा पॅन इंडिया चित्रपट २७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT