पॉवरहाऊस निर्मित चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये कायमच चर्चा होत असते. साजिद नाडियादवाला निर्मित ‘हाऊसफुल’ची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘हाऊसफुल’च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या पाचव्या भागाची घोषणा केली होती. त्यावेळी चित्रपट २०२४मध्ये, रिलीज होणार असं सांगण्यात आलं होतं. पण आता नुकतंच निर्मात्यांनी चित्रपटाचा नवा पोस्टर शेअर करत नवी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली.
अभिनेता अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपूर्वी ‘मिशन राणीगंज’मुळे चर्चेत होता. आता त्यानंतर अक्षय सध्या ‘हाऊसफुल ५’ मुळे चर्चेत आला आहे. अक्षय कुमारने नुकताच सोशल मीडियावर चित्रपटाचा पोस्टर शेअर करत चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली आहे. हा चित्रपट निर्मात्यांचा २०२४ मध्ये रिलीज करण्याचा प्लॅन होता. पण काही कारणास्तव चित्रपटाची रिलीज डेट २०२५ मध्ये प्लॅन केली आहे. रितेश आणि अक्षयच्या चाहत्यांना आता २०२५ पर्यंतची वाट पाहायला लागणार आहे.
‘हाऊसफुल ५’चं ऑफिशियल पोस्टर शेअर करताना, निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी एक स्टेटमेंटदेखील जाहीर केलं आहे. त्या स्टेटमेंटमध्ये, निर्माते साजिद नाडियावाला म्हणतात, “हाऊसफुलच्या सर्व भागांना मिळालेलं यश प्रेक्षकांना माहिती आहे. आता ‘हाऊसफुल ५’ला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी आशा करतो. चित्रपटाची कथाही उत्तम असून या फ्रेंचायझीमध्ये प्रेक्षकांना व्हिएफएक्सही पाहायला मिळणार आहे. ‘हाऊसफुल ५’ तुमचं मनोरंजन करेल अशी आशा करतो. याच कारणामुळे चित्रपट ६ जून २०२५ ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.”
अक्षय कुमारने चित्रपटाचा पोस्टर शेअर करताना, ‘पाचव्यांदा मनोरंजनाचा धमाका करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. ६ जून २०२५ला थिएटरमध्ये भेटू’ चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियादवाला असून चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी आहे. चित्रपटाचे आतापर्यंत चार भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. पहिला भाग २०१० मध्ये, दुसरा भाग २०१२ मध्ये, तिसरा भाग २०१६मध्ये, चौथा भाग २०१९मध्ये, तर ‘हाऊसफुल ५’ प्रेक्षकांच्या भेटीला ६ जून २०२५ मध्ये येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.