Crew 3rd Day Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Crew 3rd Day Collection: करीना-क्रिती-तब्बू्च्या 'क्रू'चा वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर दंगा, तीन दिवसांत केली बक्कळ कमाई

Crew Box Office Collection: २९ मार्चला रिलीज झालेल्या ‘क्रू’ चित्रपटाची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केलेली आहे.

Chetan Bodke

Crew 3rd Day Box Office Collection

सध्या बॉलिवूडमध्ये स्त्री प्रधान चित्रपटांची चर्चा सुरू आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गेल्या आठवड्यामध्ये म्हणजेच २९ मार्चला रिलीज झालेला ‘क्रू’ चित्रपटाची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत, करीना कपूर खान, क्रिती सेनन, तब्बू ही तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. प्रदर्शनाच्या आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची जोरदार क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केलेली आहे. जाणून घेऊया चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईबद्दल... (Bollywood)

२०२४ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये करीना कपूरच्या या चित्रपटाचा समावेश झालेला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ९.२५ कोटी, दुसऱ्या दिवशी ९.६० कोटींची आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी १०.२५ कोटींची कमाई केली आहे. रविवारच्या कमाईचा आकडा हा सर्वाधिक असून पहिल्या विकेंडमध्ये चित्रपटाने २९.२५ कोटींची कमाई केलेली आहे. (Bollywood Film)

तर जगभरामध्ये चित्रपटाने ४५ कोटींच्या आसपास कमाई केलेली आहे. अद्याप तिसऱ्या दिवसाच्या कमाईचा आकडा समोर आलेला नाही. तिसऱ्या दिवसाच्या कमाई आकडा समोर आल्यानंतर, चित्रपट जगभरामध्ये ५० कोटींचा आकडा पार करेल. (Bollywood News)

'क्रू' चित्रपटाचे कथानक, एका दिवाळखोर विमान कंपनीत काम करणाऱ्या तीन एअर होस्टेसचे कथानक आहे. तिघेही आपापल्या आयुष्यातील समस्यांमध्ये अडकले आहेत. विमान कंपनीमध्ये काम करूनही पगार मिळत नाही. त्या तिघीही जेव्हा चुकीचं काम करतात, त्यावेळी कथेमध्ये एक वेगळाच ट्वीस्ट येतो. त्या तिघीही काय चुकीचं काम करतात?, ते काम केल्याने त्यांच्या अडचणीत कशी वाढ होते? हे सगळं चित्रपट पाहिल्यावरंच कळतं. (Bollywood Actress)

तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनॉन व्यतिरिक्त चित्रपटामध्ये, दिलजीत दोसांझ, कॉमेडियन कपिल शर्मा, सास्वता चॅटर्जी, राजेश शर्मा आणि कुलभूषण खरबंदा यांचाही समावेश आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश ए कृष्णन यांनी केले आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Government Formation: बिहारमध्ये पुन्हा 'नितीश सरकार', नितीश कुमारांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

Maharashtra Live News Update: नीतीश कुमार यांनी घेतली बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

Accident News : ताम्हिणी घाटात अपघाताचा थरार, भरधाव कार ५०० फूट खोल दरीत कोसळली; तिघांचा मृत्यू

Maharashtra New Highway: महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवा महामार्ग! पुणे ते संभाजीनगर प्रवास होईल सुसाट; कसा असणार प्लान?

Lohagad Fort: विकेंडसाठी प्लान करताय? लोणावळ्यापासून १५ किलोमीटरवर वसलाय 'लोहगड किल्ला', नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT