Bheed Trailer Out
Bheed Trailer Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

भयाण वास्तवावर आधारित असलेल्या 'Bheed'चा ट्रेलर प्रदर्शित, राजकुमारचा अंगावर काटा आणणारा अभिनय

Chetan Bodke

Bheed Trailer Out: अवघ्या जगाला ज्या संकटानं पुर्णपणे वेठीस धरलं, ते संकट म्हणजे कोरोना महामारी. कोरोना महामारीने सर्वांनाच खूप काही नवी शिकवण दिली. कोरोना महामारी रुपी आलेल्या भयाण वास्तवाची कथा लवकरच प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावरुन अनुभवता येणार आहे. 'आज रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण देशात संपूर्ण लॉकडाऊन होणार आहे'... या वाक्याने सर्वांनाच पळता भुई थोडी केली होती. कोरोना काळातील अनेक किस्से आजही आपण ऐकले तरी, आपल्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही.

याच लॉकडाऊनवर आता अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'भिड' चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून चित्रपटात प्रमुख भूमिकेत राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर दिसत आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहे. आता या बहुप्रतिक्षित 'भिड' चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे.

ट्रेलरमध्ये राजकुमार राव, पंकज कपूर, भूमी पेडणेकर, आशुतोष राणा, दिया मिर्झा, वीरेंद्र सक्सेना, आदित्य श्रीवास्तव, करण पंडित, आणि कृतिका कामरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनुभव सिन्हा यांचा चित्रपट 2020 मधील लॉकडाऊन दरम्यानच्या भयानक वास्तवावर चित्रित करण्यात आला आहे.

'भिड' या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कोरोनाच्या काळातील कथा मांडण्यात आली आहे. सामान्य माणसाला न्याय मिळणे किती कठीण होऊन बसते, या सर्व घटना ट्रेलरमध्ये कैद झाल्या आहेत. हा चित्रपट 24 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सस्पेंसने भरलेला हा ट्रेलर मोनोक्रोममध्ये आहे. 'भिड'चा ट्रेलर कोरोना वैश्विक महामारीतील काळावर आधारित आहे, लॉकडाऊनमुळे देशात सीमारेषा आखल्या होत्या. दिलेल्या सीमारेषा आजही पाहिल्यावर त्या भयान वास्तवाची आपल्याला आठवण आल्याशिवाय राहत नाही.

चित्रपट त्या काळातील कठोर वास्तवावर चित्रित करण्यात आला आहे. देशव्यापी लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित कामगार मुलभूत गरजांविना अडकून पडले होते आणि घरचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होते.

सामान्य माणसाला कठीण प्रसंगी न्याय मिळणे किती अवघड होऊन बसते, या सर्व घटना ट्रेलरमध्ये कैद झाल्या आहेत. 'भिड' चित्रपटाच्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचली आहे.

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या कलाकृतीला प्रेक्षक नेहमीच चांगला प्रतिसाद देतात. त्यांनी आतापर्यंत बॉलिवूडला थप्पड, मुल्क आणि आर्टिकल १५ या चित्रपटांच्या माध्यमांतून उत्तमोत्तम कलाकृती दिली आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या चित्रपटाचा ट्रेलरलाही प्रेक्षकांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे. 24 मार्च 2023 रोजी भारतात लॉकडाऊनला 3 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे हा चित्रपट तेव्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय दिग्दर्शकांनी घेतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah: रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने पराभूत होतील, अमित शाह यांचं भाकीत

Today's Marathi News Live : उध्दव ठाकरे यांच्या धाराशिव येथील सभेला मोठी गर्दी

Jammu Kashmir: काश्मीरमध्ये हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला

Prakash Ambedkar On Pm Modi | नरेंद्र मोदींना मौत का सौदार बोलणे योग्यच आंबेडकरांचं कॉंग्रेसशी एकमत

Bajarang Sonawane Viral Video | Beed येथे मराठा आंदोलकांनी बजरंग सोनवणे यांची गाडी अडवली! काय घडलं?

SCROLL FOR NEXT