Sangeeth Sivan Passes Away on 8 May 2024 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sangeeth Sivan Passes Away: बॉलिवूडवर शोककळा; दिग्दर्शक संगीत सिवन यांचं निधन

Bollywood Director Sangeeth Sivan Died: हिंदी चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन झाले आहे. ८ मे रोजी संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संगीत सिवन यांच्या निधनाने इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंदी चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन झाले आहे. ८ मे रोजी संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संगीत सिवन यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. संगीत सिवन यांनी 'यमला पगला दिवाना २', 'क्या कूल है हम', 'अपना सपना मनी मनी' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.

संगीत सिवन यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. संगीत सिवन यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. संगीत सिवन यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. रितेश देशमुखने सोशल मीडियाच्या माध्यमातून संगीत सिवन यांनी आदरांजली वाहिली आहे. V

रितेश देशमुखने एक्स या अकाउंटवर संगीत सिवन यांचे फोटो पोस्ट करत म्हटले आहे की, 'संगीत सिवन यांच्या निधनाची माहिती मिळताच खूप दुःख झाले. जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीत नवीन असता तेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवावा आणि तुम्हाला संधी द्यावी असे वाटत असते. तुम्ही मला क्या कूल है हम, अपना सपना मनी मनी या चित्रपटात संधी दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. ते अत्यंत मृदुभाषी आणि खूप उत्तम व्यक्ती होते. आज त्यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. त्यांचे कुटुंब भाऊ, पत्नी, मुले यांच्या दुःखात मी सहभागी आहे. तुमची कायम आठवण येईल'.

रितेश देशमुखसोबत सनी देओल, श्रेयस तळपदे यांनीदेखील संगीत सिवन यांना आदरांजली वाहिली आहे. तुमच्या निधनाची बातमी ऐकून खूप जास्त दुःख झाले. सनी देओलने सोशल मीडियाच्या माध्यमातून संगीत सिवन यांनी आंदराजली वाहिली आहे. 'मला विश्वासच बसत नाहीये की, तू आता आमच्यासोबत नसशील. परंतु तु आमच्या मनात आणि आठवणींमध्ये सदैव असशील. ओम शांती ओम मित्रा. तुमच्या कुटुंबाला या दुः खातून सावरण्यासाठी बळ मिळावे हीच प्रार्थना', असे सनी देओल यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT