Tripti Dimri Upcoming Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tripti Dimri Film : 'ॲनिमल'नंतर तृप्ती डिमरीचं नशिबंच पालटलं; दिसणार आगामी ४ चित्रपटांत

Tripti Dimri Upcoming Films : 'ॲनिमल' सिनेमाच्या यशानंतर प्रेक्षकांची लाडकी भाभी NO. 2 म्हणजे तृप्ती डिमरीचं नशीब चांगलेच चमकलेय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्वेता जोशी- साम टीव्ही

'ॲनिमल' सिनेमाच्या यशानंतर प्रेक्षकांची लाडकी भाभी NO. 2 म्हणजे तृप्ती डिमरीचं नशीब चांगलेच चमकलेय. तृप्ती पुन्हा चर्चेत आहे, तिचा आगामी सिनेमा 'बॅड न्यूज' मुळे. मात्र येणाऱ्या काळात हा एकच नव्हे तर तृप्तीचे तब्बल चार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कोणते आहेत हे बिगबजेट प्रोजेक्ट्स पाहूयात..

 येत्या19 जुलैला 'बॅड न्यूज' सिनेमा रिलीज होतोय.ज्यामध्ये प्रेग्नंट तृप्ति डिमरी, अभिनेता विकी कौशल आणि एमी वर्कसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. ट्रेलरवरून सिनेमाची स्टोरी खूपच मजेदार असून यातून प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल धमाका मिळणार आहे असचं दिसतयं.

11 ऑक्टोबर तृप्ती डिमरीचा 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' हा सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमाचं नाव जरी कन्फुजिंग असलं तरी हा कौंटुबिक सिनेमा असल्याचं मेकर्सनी स्पष्ट केलयं. या सिनेमात तृप्ति आणि राजकुमार रावची तगडी केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. सध्या या सिनेमाचं शुटिंग सुरु आहे. 90 च्या दशकावर आधारित हा सिनेमा आहे.

200 कोटींची कमाई करणाऱ्या 'भुलभुलय्या 2' सिनेमाच्या पुढच्या सिझनमध्ये असणाऱया मिस्ट्री गर्लच्या चेहऱ्यावरचा पडदा अखेर उठलाय. कियारा अडवाणीची जागा तृप्ति डिमरी ने घेतली आहे. मात्र अनेक प्रेक्षकांनी यावर आपली नाराजी व्यक्त केली होती. आता तृप्ति आणि कार्तिक आर्यनची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडते का हेच पाहायच आहे. या वर्षाच्या अखेरीस हा सिनेमा रिलीज होईल अशी चर्चा आहे.

करण जौहरच्या फिल्ममध्येही तृप्तिची वर्णी लागली आहे. करण जोहरच्या 'धडक 2' मध्ये चाहत्यांना सिद्धार्थ चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरीची फ्रेश जोडी पडद्यावर पाहायला मिळेल. हा चित्रपट 22 नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. नीलेश आणि विदिशाच्या प्रेमकहाणीची ओळख चाहत्यांना होणार आहे. या दोन्ही स्टार्सचा फर्स्ट लूकही समोर आला आहे.

थोडक्यात अनेक सुपरहिट सिनेमांच्या सिक्वल मध्ये तृप्ति डिमरी दिसेल. ज्यात तिने अनेक दिग्गज हिरोईन्सला रिप्लेसही केलयं. याचाच अर्थ नॅशनल क्रश असणारी तृप्ति डिमरी भाभी नंबर 2 वरून आता बॉलिवूडची हिरोईन नंबर 1 बनत असल्याचंच दिसून येतयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Dome : मोर्चाच्या चर्चेने सरकारला माघार घ्यावी लागली: Raj Thackeray | VIDEO

अनाजीपंत, अंतरपाट ते बाळासाहेब...; ठाकरे बंधू फडणवीसांवर तुटून पडले

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

SCROLL FOR NEXT