Tanushree Datta: प्रकाश झा दिग्दर्शित 'लाल बत्ती' या वेबसिरीजमधून नाना पाटेकर काही वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहेत. ही एक सामाजिक आणि राजकीय विषय हाताळणारी वेबसीरिज आहे. या वेबसीरिजच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने पुन्हा एकदा नाना पाटेकरांविरोधात भाष्य केले आहे. सोशल मीडियावर तनुश्रीने वाईट भाषा वापरत शिवीगाळ देखील केली आहे.
तनुश्री दत्ताने #MeToo चळवळीदरम्यान नाना पाटेकर यांच्यावर चित्रपटाच्या सेटवर विनयभंग केल्याचा आरोप केला होता. आता पुन्हा एकदा तनुश्रीने इंस्टाग्रामवर नाना पाटेकर यांच्यावर टीका केली आहे. तनुश्री दत्ताने लिहिले आहे की, 'बॉलिवूडमध्ये असे पुरुष आहेत जे निष्पाप मुलींना त्रास देतात आणि त्यांचे करिअर आणि आयुष्य खराब करतात. अशी कृत्ये खूप वाईट आहेत कारण त्यांनी मला आणि माझ्यासारख्या इतरांना आयुष्यभर खूप वेदना दिल्या आहेत.'
तनुश्री पुढे लिहिते, 'नाना पाटेकर एक दुष्ट माणूस आहे, ज्यांचे चित्रपट अनेक वर्ष संघर्ष करूनही चित्रपटगृहात प्रदर्शित होत नाहीत. त्यांचे सर्वच चित्रपट फ्लॉप आणि खराब कामगिरीचे असतात. मी खूप वर्षांपूर्वी म्हणाले होते, ते आता सिद्ध होत आहे. त्यांचे चित्रपट मोठ्या तोट्यानंतर प्रदर्शित होण्यासाठी 4-5 वर्षे लागतात, तेही छोट्या बजेटच्या OTT प्लॅटफॉर्मवर, ज्यांच्याकडे मर्यादित दर्शक आहेत. पाटेकर एक जुना आणि कालबाह्य अभिनेता आहे जो प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी सर्व पीआर युक्त्या वापरतो, तरीही भारतातील लोक त्याचा तिरस्कार करतात.'
तनुश्री इतक्यातच थांबली नसून, 'भूतकाळातील प्रसिद्धी आणि राजकारण्यांसोबत राहणारे, त्यांच्या सोबत नेहमी सहवास असणारे सुद्धा या बुडत्या जहाजाला वाचवू शकणार नाहीत. किंबहुना नाना पाटेकरांच्या खांद्याला खांदा लावून जो कलाकार किंवा व्यक्ती चालतो तोच आपले आयुष्य बरबाद करुन घेतो.
ज्या राजकारण्यांशी ते एकेकाळी संपर्कात होते, त्यांनी त्यांचे स्थान गमावले. महिला अत्याचार करणार्या व्यक्तीसोबत राहणाऱ्या पुरुषाला कोणताही मतदार मत देणार नाही. हे आपल्या भारतीय संस्कृतीत नाही. जोपर्यंत नागरिकांना ही गोष्ट माहित नाही तो पर्यंत ही बाब नक्की घडणार.'
पुढे लिहिले की, 'न्याय आणि कायदा यात फेरफार केला जाऊ शकतो पण भारतीयांना नेहमी आपल्या मनाचेच सत्य वाटते. आपले राष्ट्र एक अंतर्ज्ञानी समुदाय असलेला राष्ट्र आहे. केवळ चांगले नैतिक मूल्य असणारे पुरुषच सत्तेत राहतात. वाईट लोक त्यांचे वाईट कर्म आणि वाईट ऊर्जा तुमच्यावर टाकतात त्यामुळे आपल्याकडील सर्व गोष्टी आपण गमावत जातो.
म्हणूनच वडिलांनी आम्हाला संत, समवयस्क आणि जे नेहमीच देवाच्या संपर्कात राहतात अशा लोकांचा सहवासात राहण्यास सांगितले. अपवित्र दुष्ट लोक सर्व प्रयत्नांचा अंत करतात. अशा प्रकारे हे सिद्ध होते की जर तुम्ही वाईट व्यक्ती असाल तर कितीही पैसा, स्नायू शक्ती, हेराफेरी, कनेक्शन किंवा युक्ती तुम्हाला विनाशापासून वाचवू शकत नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.