Paresh Rawal: परेश रावल यांना 'ते' वक्त्यव्य भोवणार? माकपा नेत्यांची पोलिस स्टेशनात धाव

परेश रावल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Paresh Rawal Speech
Paresh Rawal Speech Saam Tv
Published On

Paresh Rawal News: अभिनेते आणि भाजपचे माजी खासदार परेश रावल सध्या गुजरात निवडणुकीचा प्रचार करत आहेत. या प्रचारदरम्यान केलेल्या एका भाषणामुळे परेश रावल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते मोहम्मद सलीम यांनी शुक्रवारी परेश रावल यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.

ताराटोला पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करताना सलीम यांनी सांगितले की, 'मी एक व्हिडिओ पाहिला, त्यामध्ये परेश रावल भाषण करताना दिसत आहेत. या भाषणात परेश रावल बंगाली लोकांच्या विरोधात द्वेषाची भावना निर्माण करत आहेत.'

Paresh Rawal Speech
Urfi Javed Video: जाळ्यात अडकलेल्या उर्फीने चाहत्यांना दिला रेड अलर्ट

माकपा नेते यांनी म्हटले आहे की, भारताच्या इतर भागात राहणारे बंगाली भाषिक परेश रावल यांच्या या विधानाने प्रभावित होऊ शकतात. बंगाली भाषिक आणि त्यांचे समर्थन करणाऱ्यांनी टीका केल्यानंतर परेश रावल यांनी त्यांच्या या वक्तव्यावर माफी मागितली आहे. (Politician)

पश्चिम बंगालचे सीपीआय(एम)चे राज्य सचिव सतीम यांनी दावा केला की, सार्वजनिक ठिकाणी असे भाषण दंगली भडकवण्यासाठी आणि सार्वजनिक क्षोभ निर्माण करण्यासाठी तसेच बंगाली समुदाय आणि देशभरातील इतर समुदायांमधील एकोपा नष्ट करण्यासाठी केले गेले आहे.

मोहम्मद सलीम म्हणाले की, रावल यांनी संगनमताचा निंदनीय संदर्भ दिला आहे. बांगलादेशी, रोहिंग्या, बंगाली आणि मासे यांना गॅस सिलिंडरशी जोडले आहे. (Gujarat)

गॅस सिलेंडरचे भाव वाढले आहेत, त्याचे दर कमी होतील. परंतु जर रोहिंग्या आणि बांग्लादेशी दिल्लीसारखे तुमच्या आजूबाजूला राहायला आले तर काय होईल? गॅस सिलेंडरचे तुम्ही काय करणार? बंगाल्यांसाठी माझे शिजवणार? असे वादग्रस्त विधान गुजरात निवडणूक प्रचार दरम्यान परेश रावल केले होते. यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. परेश रावल यांनी शुक्रवारी माफी सुद्धा मागितली. माफी मागताना ते म्हणाले की 'मी अवैधरित्या स्थलांतर करणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांविषयी बोललो होतो'. (Paresh Rawal)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com