Marathi Movie Trailer: धोंडी- चंप्यासह ओवी- आदित्यची प्रेमकहाणी खुलणार, 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ चा विनोदी ट्रेलर प्रदर्शित

'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा धमाल विनोदी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा विनोदी शैलीतील चित्रपट असून यामध्ये अनोखी प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे.
Dhondi Champya Ek Prem Katha Trailer Out
Dhondi Champya Ek Prem Katha Trailer OutSaam Tv

Dhondi Champya Ek Prem Katha: 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा धमाल विनोदी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा विनोदी शैलीतील चित्रपट असून यामध्ये अनोखी प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. यामध्ये धोंडी म्हणजे म्हशीची तर चंप्या म्हणजे रेड्याची अनोखी जगावेगळी प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे.

Dhondi Champya Ek Prem Katha Trailer Out
Paresh Rawal: परेश रावल यांना 'ते' वक्त्यव्य भोवणार? माकपा नेत्यांची पोलिस स्टेशनात धाव

ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, वैभव मांगले, सायली पाटील, निखिल चव्हाण हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटात धोंडी चंप्याच्या प्रेमकहाणी बरोबरच ओवी -आदित्यची प्रेमकहाणीही खुलताना दिसणार आहे.

आपण नेहमीच मुला मुलीची प्रेम कथा पाहत आलोय. परंतु ही प्रेमकहाणी एका रेडा आणि म्हशीची म्हणजेच धोंडी आणि चंप्याची असून या प्रेमकहाणीत आणखी एक लव्हस्टोरी लपलेली आहे, ती म्हणजे सायली आणि निखिलची म्हणजेच ओवी आणि आदित्यची. या सगळ्यांच्या प्रेमाच्या आड येत आहेत, अंकुश आणि उमाजी, म्हणजे भरत जाधव आणि वैभव मांगले.

Dhondi Champya Ek Prem Katha Trailer Out
Megha Thakur: टिकटॉक स्टार मेघा ठाकूरचे निधन; अवघ्या 21 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

हे दोघं एकाच गावचे असून दोघांमध्ये काही कारणास्तव शत्रुत्व असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे त्यांचे खटके उडताना दिसत आहेत. आता धोंडी-चंप्या आणि ओवी-आदित्यची प्रेमकहाणी यशस्वी होणार का, की शत्रुत्व जिंकणार हे जाणून घेण्यासाठी आपल्याला १६ डिसेंबरला थिएटरमध्ये सिनेमा पाहावा लागेल.

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर म्हणतात, "प्रेक्षकांना विनोदी चित्रपट आवडतात. ही एक धमाकेदार कहाणी आहे. निव्वळ मनोरंजन असलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी आपल्या कुटुंबासोबत पाहावा असा आहे. धोंडी आणि चंप्याला एकत्र आणताना उडणारी धमाल यात पाहायला मिळणार असून प्रेमकथा आणि विनोद हे दोन्ही जॉनर अनुभवायला मिळतील. या चित्रपटाच्या निमित्ताने भरत जाधव, वैभव मांगले हे हास्यसम्राट एकत्र आले आहेत."

Dhondi Champya Ek Prem Katha Trailer Out
Ajay Devgan: अजयने भर गर्दीत विनाहेल्मेट चालवली गाडी, चाहत्यांची त्याच्या पाठी एकच धुम

रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत सुनील जैन आणि कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित 'धोंडी चंप्या - एक प्रेम कथा' हा चित्रपट प्रभाकर भोगले यांच्या कथेला प्रेरित होऊन बनवण्यात आला असून याची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांचे आहेत. सुनील जैन, आदित्य जोशी, व्हेनिसा रॉय, आदित्य शास्त्री निर्माते असून अमित अवस्थी, सुशांत वेंगुर्लेकर हे सहनिर्माते आहेत. येत्या १६ डिसेंबर रोजी 'धोंडी चंप्या प्रेक्षकांना चित्रपटगृहात भेटायला येणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com