Suniel Shetty: अक्षय कुमार-अजय देवगणच्या यशाने सुनील शेट्टी वाटेतय का असुरक्षितता ? अभिनेत्याने दिले स्पष्टीकरण

सुनील शेट्टीने अक्षय कुमार आणि अजय देवगण यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.
Bollywood Actors
Bollywood Actors SaamTv

सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांनी १९९०च्या दशकापासून त्यांच्या करियरला सुरूवात केली. सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत आणि अजूनही देत आहेत. अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांनी 'मोहरा', 'धडकन'पासून 'हेरा फेरी'पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अजय देवगणसह सुनील शेट्टीने ‘दिलावाले’, ‘क़यामत’, ‘एलओसी: कारगिल,’ ‘ब्लैकमेल’ आणि ‘कॅश’सारखे चित्रपट केले आहेत.

Bollywood Actors
Paresh Rawal: परेश रावल यांना 'ते' वक्त्यव्य भोवणार? माकपा नेत्यांची पोलिस स्टेशनात धाव

सुनील शेट्टी अजय देवगण आणि अक्षय कुमार यांचे यश बघून अस्वस्थ होतो असे त्याच्याविषयी नेहमीच म्हटले जाते. आता सुनील शेट्टीने यावर त्यांचे मत व्यक्त केले आहे. तसेच सुनील शेट्टीने अक्षय कुमारविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

मीडियाशी बोलताना सुनीत शेट्टीने त्याच्या वाईट काळाविषयी सांगितले. तसेच सुनील शेट्टीने सांगितले की ती त्याच्या कोस्टार अक्षय कुमार यांच्या यशाने कधीच अस्वस्थ झाला नाही.

सुनील शेट्टी म्हणाला की, 'मी कधीच प्रेशर घेत नाही, मी माझ्या जागी एकदम बरोबर आहे. माझ्याकडे इतके सुंदर आयुष्य आहे. कदाचित लोकांना ते हवे असेल. माझ्या खूप गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा मला आनंद होतो. माझ्या जीवनात मला जे करायचे होते ते मी केले आहे आणि करत आहे. मी माझ्या जागी योग्य आहे. यश आणि अपयश हे चित्रपटांवर अवलंबून असते.'

सुनील शेट्टीला त्याच्या कोस्टारच्या यशाने कधीच अस्वस्थ वाटले नाही. त्याला त्याच्या कोस्टारनी नेहमीच प्रेरित केले आहे. 'मला अस्वस्थ नाही वाटत. अक्षय कुमार आणि अजय देवगण मला नेहमीच प्रेरित करतात. फक्त चित्रपटांसाठी फोकस असावं असं काही नाही. तुम्ही फोकस असलात तर तुम्ही जे हवे ते मिळवू शकता. जेव्हा मी काम करत होतो तेव्हा मी फोकस नव्हतो. मी यावर लक्ष नाही दिले. मी जी स्क्रिप्ट ऐकायचो त्यावर विश्वास ठेवायचो आणि ही चूक मी केली' असे सुनील शेट्टीने म्हटले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com