Stree 2 Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Stree 2 Blockbaster: स्त्री २ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धमाका, 'ॲनिमल 'आणि 'गदर'चा मोडला रेकॉर्ड

Stree 2 Movie Blockbaster Records: अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांचा 'स्त्री २' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरतोय. 'स्त्री २' या चित्रपटाने 'ॲनिमल 'आणि 'गदर' या चित्रपटांचा रेकॉर्ड मोडलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांच्या 'स्त्री २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. चित्रपटामधील श्रद्धा आणि राजकुमारच्या अभिनयाचे प्रेक्षक तोंडभरून कौतुक करत आहेत. स्त्री २ चित्रपटगृहामध्ये १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. पहिल्या दिवसापासून चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रदर्शित झाल्यानंतर अगदी तीन दिवसांमध्ये स्त्री २ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. चित्रपटानं पहिल्या दोन ते तीन दिवसांमध्ये १०० कोटींचा गल्ला गाठला होता.

स्त्री २ चित्रपटाने अनेक ब्लॉकबास्टर चित्रपटांना मागे टाकून नवीन विक्रम केले आहेत. या चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी यासारख्या कलाकारांनी अभिनय केला. या कलाकारांनी प्रेक्षकांना खळखळून हसावलंय. प्रेक्षकांच्या मते स्त्री २ हा चित्रपट २०२४ चा बेस्ट हॉरर चित्रपट ठरणार आहे. चित्रपटामधील 'आज की रात' हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीचं ठरलं आहे. या गाण्याच्या माध्यमातून तमन्ना भाटियाने आयटम सॉग केले आहे.

स्त्री २ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून आतापर्यंत ५१० कोटींचा टप्पा गाठत नवा इतिहास रचला आहे. श्रद्धाच्या 'स्त्री २' चित्रपटाने रणबीर कपूरच्या ॲनिमल आणि सनी देओलच्या गदर चित्रपटाला कलेक्शनमध्ये मागे टाकलं आहे. रणबीरच्या ॲनिमल या चित्रपटानं जगभरात २५५. ४६ कोटींचं कलेक्शन केलं होतं. ॲनिमल चित्रपटामधील रणबीरच्या अभिनयामुळे चित्रपट सुपरहिट ठरला होता. ॲनिमल चित्रपटामध्ये रणबीरसोबत रश्मिका मंधाना आणि तृप्ती डिमरी या दोन अभिनेत्री दिसल्या होत्या. चित्रपटामधील तृप्तीच्या भाभी २ या पात्राला चाहत्यांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला होता.

सनी देओलच्या 'गदर २' ने बॉक्स ऑफिसवर धमाका करत ६२५.५४ कोटींचा गल्ला गाठला होता. चित्रपटामधील सनी देओलच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांकडून चित्रपटाला पसंती मिळाली होती. 'स्त्री २' चित्रपटाने ५१० कोटींचा टप्पा गाठून 'ॲनिमल 'आणि 'गदर' या चित्रपटांना मागे टाकले आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरताना दिसतोय.

Edited By: Nirmiti Rasal

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT