Genelia SAAM TV
मनोरंजन बातम्या

Genelia : जिंगल बेल्स, जिंगल ऑल द वे! देशमुखांच्या घरी नाताळची जय्यत तयारी सुरू, रितेशनं मुलांसह सजवला ख्रिसमस ट्री

Riteish Deshmukh Christmas Decoration : देशमुखांच्या घरी ख्रिसमसची जय्यत तयारी पाहायला मिळत आहे. जिनिलीयाने रितेश देशमुखचा मुलांसोबत ख्रिसमस ट्री डेकोरेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Shreya Maskar

ख्रिसमस (Christmas 2024 ) आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अनेकांच्या घरी ख्रिसमसची तयारी चालू झालेली पाहायला मिळत आहे. ख्रिसमस 25 डिसेंबरला असतो. ख्रिसमस वेळी सर्वत्र रोषणाई आणि लाल रंग पाहायला मिळतो. ख्रिसमस हा विशेषता लहान मुलांचा आवडता सण आहे. ख्रिसमसला सांताक्लॉज लहान मुलांना गिफ्ट देतो. अनेक ठिकाणी ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले जाते.

ख्रिसमसची लगबग बॉलिवूडच्या देशमुख कुटुंबातही पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी ख्रिसमसच्या तयारीला लागले आहेत. रितेश देशमुख आणि जिनिलीयाचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या घरी प्रत्येक सण मोठ्या धुमधड्याक्यात पार पडतो. जिनिलीया ख्रिश्चन असूनही सर्व मराठमोळ्या गोष्टी, सण आणि परंपरा तिला माहिती आहे. ती या सर्व गोष्टी नेहमीच फॉलो करताना दिसते.

रितेश (Riteish Deshmukh) आणि जिनिलीयाच्या (Genelia) घरी ख्रिसमसचे खास सेलिब्रेशन असते. या सेलिब्रेशनच्या तयारीचा एक व्हिडीओ जिनिलीयाने सोशल मीडियावर टाकला आहे. जिनिलीयाने इन्स्टाग्रामवर ख्रिसमस ट्री डेकोरेशनचा (Christmas Tree Decoration) व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात रितेश देशमुख आपल्या मुलांसोबत (रियान, राहील ) ख्रिसमस ट्री सजवताना पाहायला मिळत आहे.

genelia

याआधी देखील राहील आणि रियानने गणोशोत्सवात रितेश देशमुखसोबत बाप्पाची सुरेख मूर्ती घडवली होती. अनेक वर्ष एकमेकांना डेट करून अखेर रितेश आणि जिनिलीयाने 2012 मध्ये लग्नगाठ बांधली. यांनी मराठमोळ्या आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले. रितेश देशमुख आणि जिनिलीयाच्या मुलांच्या संस्काराचे कायमच सर्वांकडून कौतुक होते. रितेश देशमुख आणि जिनिलीया कायमच एकमेकांचा आदर करताना पाहायला मिळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father shot: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर झाडल्या गोळ्या; २ तरुणांनी केला हत्येचा प्रयत्न

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

SCROLL FOR NEXT