मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या 'फुलवंती' चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. 'फुलवंती'खूप गाजत आहे. प्राजक्ता माळी एक उत्तम अभिनेत्रीसोबत चांगली कवयित्री, नृत्यांगना आणि व्यावसायिका देखील आहे. तसेच 'फुलवंती' या चित्रपटामुळे तिने निर्माती क्षेत्रातही पदार्पण केले आहे. नुकताच अशा हरहुन्नरी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा (Prajakta Mali) नवोदित कवयित्री म्हणून सन्मान करण्यात आला आहे.
प्राजक्ता माळीला 'महाराष्ट्र साहित्य परिषद' चा 'सुनीताबाई स्मृती साहित्य पुरस्कार' मिळाला आहे. या मोठ्या पुरस्काराने प्राजक्ताला गौरविण्यात आले आहे. यासंबंधित एक खास पोस्ट प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टला तिने भावुक कॅप्शन दिलं आहे. प्राजक्ताला हा सन्मान मिळाल्यामुळे चाहते खूप खुश पाहायला मिळत आहे.
"पुरस्कार अनेक मिळतात पण साहित्य क्षेत्रातील संस्थांची मातृसंस्था असलेल्या "महाराष्ट्र साहित्य परिषदेचा" पुरस्कार मिळणं हे माझं अहोभाग्य...महाराष्ट्र साहित्य परिषद...सुनीताबाई स्मृती साहित्य पुरस्कार...नवोदित कवयित्री....स्थळ -माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रोड, पुणे..."
"याच ठिकाणी प्राजक्तप्रभाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन झालं होतं. पहिल्या आवृत्तीचं प्रकाशन ज्यांच्या हस्ते झालं अशा ज्येष्ठ कवी प्रविण दवणे यांच्याच हस्ते पुरस्कार मिळाला. योगायोग... अभिनेत्री असताना कवयित्री म्हणून सन्मान मिळणं हे दुर्मिळ...पाठीवर शाबासकीची थाप, पुढील लेखनासाठी प्रोत्साहन...मसाप चे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांचे विशेष आभार..."
आपल्या मनातील भावना मांडणारे कॅप्शन प्राजक्ता माळीने पोस्टला दिलं आहे. तिच्या या पोस्टवर सध्या चाहते आणि कलाकारांकडून प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्राजक्ता माळीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या सौंदर्याने ती नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते.
प्राजक्ताचा 'फुलवंती' चित्रपट अजूनही गाजत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्नेहल तरडेने केले आहे. 'फुलवंती'चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात प्राजक्तासोबत गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत आहे. प्राजक्ताने आजवर अनेक हिट चित्रपट, नाटक आणि मालिका केल्या आहेत. आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात मोठे स्थान निर्माण केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.