Rekha  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Rekha : अक्षय कुमारला इग्नोर तर अभिषेक बच्चनला मारली मिठी, रेखा यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

Rekha-Abhishek-Akshay Viral Video : सध्या रेखा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात त्या अभिषेक बच्चनला मिठी मारताना आणि अक्षय कुमारला इग्नोर करताना दिसत आहेत.

Shreya Maskar

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा (Rekha) या कायमच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या सौंदर्य पाहून चाहते कायमच घायाळ होतात. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यात त्या एका अवॉर्ड फंक्शनमध्ये स्टेजवर बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमारला इग्नोर करताना दिसल्या तर अभिषेक बच्चनला मिठी मारताना पाहायला मिळाल्या.

अक्षय कुमारने स्वबळावर बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. त्याने 2001 मध्ये अभिनेत्री ट्विंकल खन्नासोबत लग्नगाठ बांधली. पूर्वी अक्षय कुमार (Akshay Kumar) अनेक मोठ्या अभिनेत्रींसोबत जोडली गेली होती. यात रवीना टंडन, शिल्पा शेट्टी, प्रियंका चोप्रा अशा अनेकांचे नाव होते. याच यादीत बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री रेखा यांचे देखील नावाचा समावेश आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि रेखा यांच्या अफेअर्सच्या चर्चा खूप काळ रंगल्या होत्या.

नुकताच पार पडलेल्या एका अवॉर्ड फंक्शनमध्ये अक्षय कुमार आणि रेखा समोरासमोर आले. तेव्हा रेखा यांनी अक्षय कुमारला इग्नोर केले. रेखा स्टेजवर उभ्या असताना अक्षय कुमार आणि क्रिकेटपटू शिखर धवन एकापाठोपाठ स्टेजवर येतात. तेव्हा स्टेजवर रेखा अक्षयकडे दुर्लक्ष करून शिखर धवनशी बोलू लागतात. त्या अक्षयकडे पाहतच नाही. काही मिनिटांत स्टेजवर अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) येतो. तेव्हा रेखा अभिषेकला मिठी मारतात आणि त्याच्याशी गप्पा मारतात. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रेखा यांचा लूक

रेखा आणि अक्षय कुमार यांनी 'खिलाडियों का खिलाडी' या चित्रपटात एकत्र काम केले होते. अवॉर्ड फंक्शनसाठी सर्वजण व्हाईट आऊटफिटमध्ये पाहायला मिळाले. रेखा यांनी पांढऱ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती. केसात गजरा, डोळ्यांवर गॉगल आणि सुरेख मेकअप करून त्यांनी हा लूक पूर्ण केला होता. अक्षय अवॉर्ड फंक्शनमध्ये व्हाईट सूटमध्ये दिसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT