Rakhi Sawant SAAM TV
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant: TikTok वरील बंदी हटवा नाहीतर..., राखी सावंत PM मोदींवर नाराज, VIDEO व्हायरल

Rakhi Sawant Viral Video : बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत टिकटॉक बंदीमुळे खूप नाराज झाली आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून पीएम मोदींवर नाराजी व्यक्त केली आहे. तसा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. जगात घडणाऱ्या अनेक गोष्टींवर ती नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असते. सोशल मीडियावर राखी सांवतची चांगली फॅन फॉलोविंग आहे. राखी सावंत एक बिनधास्त व्यक्तिमत्व आहे. कायम आपल्या मतांमुळे ती चर्चेत असते. अशाच एका कारणामुळे राखी सावंत पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी राखी सावंतने चक्क पीएम मोदींवर (PM Narendra Modi) निशाणा साधला आहे.

अभिनेत्री राखी सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाराज झाली आहे. राखी सावंतने भारतात टिकटॉक सुरू केले नाही तर पाकिस्तान मध्ये जाण्याचा इशारा दिला आहे. टिकटॉक बंद केल्यामुळे अनेक तरुण बेरोजगार झाल्याची खंत राखी सावंतने व्हिडीओ शेअर करत व्यक्त केली आहे. सध्या जगभरात सगळीकडे टिकटॉक सुरू आहे. फक्त भारतात टिकटॉकवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे राखी सावंत खूप नाराज झाली आहे.

राखी सावंतने शेअर केलेल्या व्हिडीओला एक कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की,"मी पाकिस्तानला लग्न करून जात आहे. जर पंतप्रधान मोदींनी लवकर टिकटॉक वरील बंदी हटवली नाहीतर...तसेच टिकटॉक पुन्हा सुरू केले नाहीतर... तुम्ही भारतात पुन्हा टिकटॉक सुरू केले पाहिजे. टिकटॉक वरून बंदी हटवा. मला भारतात बोलायचे आहे नाहीतर मी पाकिस्तानात जाईन. "

राखी सावंतने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्स येत आहेत. काही लोक तिच्या पाठिंब्यात बोलत आहे. तर काही लोक तिची खिल्ली उडवत आहे. राखी सावंतचा हा व्हिडीओवर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राखी सावंतने हा व्हिडीओवर एअरपोर्टवरून शेअर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

SCROLL FOR NEXT