Priyanka And Nick Saam Tv
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra: प्रियांका चोप्रा आणि निक जोनसने का सोडलं 149 कोटीचं घरं?, आर्थिक संकटात असल्याची चर्चा; काय आहे प्रकरण?

Priyanka Chopra Luxury Home: प्रियांका आणि निक सध्या आर्थिक अडचणीत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे लॉस एंजेलिसमधील आलिशान घर सोडल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

Priya More

Priyanka Chopra And Nick Jonas:

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) यांना बॉलिवूड (Bollywood) आणि हॉलिवूडमधील (Hollywood) सर्वात क्यूट आणि पॉवरफुल कपल म्हटले जाते. प्रियांका आणि निक यूएसएमध्ये राहतात आणि तेथे त्यांनी लॉस एंजेलिसमध्ये एक आलिशान घर खरेदी केले आहे. या घरामध्ये निक आणि प्रियांका त्यांची मुलगी मालतीसोबत राहतात.

मात्र आता या दोघांच्याही चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. प्रियांका आणि निक सध्या आर्थिक अडचणीत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे लॉस एंजेलिसमधील आलिशान घर सोडल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. ही बातमी समोर येताच प्रियांका आणि निकच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनसच्या लॉस एंजेलिसमधील या आलिशान घराची किंमत २० मिलियन डॉलर म्हणजेच १४९ कोटी रुपये इतकी आहे. त्यांनी त्यांचे हे आलिशाना घर आर्थिक अडचणीमुळे रिकामे केल्याची सध्या चर्चा होत आहे. याच दरम्यान एक रिपोर्ट देखील समोर आला आहे ज्यामध्ये सांगितले आहे की, प्रियांका चोप्राने हे घर सोडण्याचा निर्णय का घेतला आणि तिने यासाठी कायदेशीर पाऊल का उचलले आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास लॉस एंजेलिसमध्ये 149 कोटी रुपये किमतीच्या घरात राहत होते. आता 'रेडडिट' वर एक रिपोर्ट समोर आला आहे ज्यामध्ये असे म्हटले जात आहे की, प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी त्यांचे 20 मिलियन डॉलरचे लॉस एंजेलिसमधील घर सोडले आहे. रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, हे कपल सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे आणि यामुळे दोघांनी घर सोडले आहे. या घरासाठी हे जोडपे दरमहा सुमारे 100 हजार अमेरिकन डॉलर्स देत होते.

रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, दोघेही 100 हजार म्हणजेच 100,000 अमेरिकन डॉलर्स देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना घर रिकामे करावे लागले आहे. प्रियांकाने सोशल मीडियावर तिच्या आलिशान घराचे अनेक फोटो शेअर केले आहेत. जे तुम्ही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील पोस्टमध्ये अनेकदा पाहिले देखील असतील. अशा परिस्थितीत घराचे भाडे देणे शक्य नसल्याने त्यांनी घर गहाण ठेवण्यासाठी बँकेकडे मोर्चा वळवला आहे.

प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस त्यांच्या लॉस एंजेलिसच्या घरात बरेच दिवस राहत होते आणि त्यांनी २०२१ मध्ये या घरात पूजा देखील केली होती. ज्याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. नुकतेच निक आपल्या दोन भावांसह मुंबईत आला होता आणि यादरम्यान त्याने लाइव्ह कॉन्सर्ट केले होते. निक जोनसचे मुंबईत आल्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT