Chhatrapati Sambhaji Movie: 'छत्रपती संभाजी' २ फेब्रुवारीला येणार भेटीला, 'या' ५ भाषांमध्ये होणार रिलीज

संकटाला निर्भीडपणे सामोरे जात पराक्रमाच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याच्या विस्तार आणि संरक्षण करणाऱ्या पराक्रमी राजाचा जीवनपट मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.
Chhatrapati Sambhaji Movie
Chhatrapati Sambhaji MovieSaam Tv
Published On

Chhatrapati Sambhaji Maharaj:

छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या शौर्याची कहाणी सांगणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'छत्रपती संभाजी' हा चित्रपट (Chhatrapati Sambhaji Movie) येत्या २ फेब्रुवारीला म्हणजेच शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाला आणि बलिदानाला जगाच्या इतिहासात तोड नाही. संकटाला निर्भीडपणे सामोरे जात पराक्रमाच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याच्या विस्तार आणि संरक्षण करणाऱ्या पराक्रमी राजाचा जीवनपट मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.

राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित 'छत्रपती संभाजी' हा चित्रपट २ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 'परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट’ आणि ‘एजे मीडिया कॉर्प’ प्रस्तुत 'छत्रपती संभाजी' हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि इंग्रजी या ५ भाषांमध्ये मध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये प्रमोद पवार, शशांक उदापूरकर, रजित कपूर, दिलीप ताहिल, मृणाल कुलकर्णी, मोहन जोशी, भरत दाभोळकर, लोकेश गुप्ते, बाळ धुरी, दिपक शिर्के,अमित देशमुख , आनंद अभ्यंकर, समीर, मोहिनी पोतदार, प्रिया गमरे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

Chhatrapati Sambhaji Movie
Aata Vel Zaali Movie: इच्छामरणावर आधारित 'आता वेळ झाली', दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी मुख्य भूमिकेत

राजकारण, मुसद्देगिरी, समाजकारण, धर्मकारण यांच्यात मुरलेले छत्रपती संभाजी महाराज रणांगणावरचे शेर होते. स्वराज्यनिष्ठा, शौर्य, धैर्य अशा अनेक अंगाने अनेक मोहिमा यशस्वी करणाऱ्या महाराजांनी निर्माण केलेला प्रेरणादायी इतिहास 'छत्रपती संभाजी' या चित्रपटातून तरुण पिढीला पाहता येणार आहे.

राजकारणातील डावपेच, गनिमी कावा या जोरावर छत्रपती संभाजी महाराजांनी सलग ९ वर्षे मुघल, आदिलशहा, सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज, आणि इतर अंतर्गत शत्रूंशी लढा देत, स्वराज्याला टिकवले आणि वाढविले. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अजोड पराक्रमाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्या साम्राज्याचा विस्तार केला.

Chhatrapati Sambhaji Movie
Superstar Dhanush: धनुषच्या चित्रपटाचे तिरुपती मंदिर परिसरात शूटिंग, गर्दी- वाहतूक कोंडीला वैतागून भाविकांची पोलिसांत तक्रार

चित्रपटाला साजेशी ६ गाणी चित्रपटात असून अविनाश विश्वजित, गुरु शर्मा आणि आरव यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. या चित्रपटाला पार्श्वसंगीत अमर-अमित देसाई यांनी दिले आहे. 'छत्रपती संभाजी' चित्रपटाची सहनिर्मिती एफआयएफ निर्मिती संस्थेची आहे. कथा सुरेश चिखले यांची आहे. छायांकन सुरेश देशमाने तर संकलन भरत भाई यांचे आहे.

Chhatrapati Sambhaji Movie
Sunny Leone: 'फना'मध्ये सनी लिओनीचे जबरदस्त ठुमके, गाण्याला मिळतेय प्रेक्षकांची पसंती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com