Parineeti Chopra Saam Tv
मनोरंजन बातम्या

Parineeti Chopra चे सासरचं घर आहे खूपच आलिशान, अभिनेत्रीने शेअर केले इनसाइड फोटो

Parineeti Chopra House Inside Photos: परिणीती चोप्राने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या सासरच्या घरातील फोटो शेअर केले आहेत.

Priya More

Parineeti Chopra In Laws House:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) लग्नानंतर सतत चर्चेत असते. लग्न झाल्यानंतर परिणीती चोप्रा सतत सोशल मीडियावर (Social Media) लग्नाशीसंबंधित फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. त्यामागचे कारण म्हणजे परिणीती चोप्राने तिच्या सासरच्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या आलिशान घराचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये परिणीतीने तिच्या घराची आतमधील झलक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परिणीती चोप्राने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या सासरच्या घरातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये परिणीतीसोबत राघव चढ्ढा आणि घरातील लहान मुलं आणि डॉग दिसत आहे. परिणीतीचे हे फोटो लग्नानंतर तिच्या सासरच्या घरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातील आहेत. परिणीती या फोटोंमध्ये खूपच आनंदी असल्याचे दिसत आहे.

परिणीती चोप्राने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'पिंक आणि पपीज' असे लिहिले आहे. याचसोबत तिने HOME हॅशटॅग केले आहे. परिणीतीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री गुलाबी रंगाच्या आउटफिटमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. परिणीतीने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ती घरातील एका लहान मुलासोबत दिसत आहे. त्याचसोबत परिणीती डॉगसोबत मस्ती करताना दिसत आहे.

परिणीतीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिच्या सासरच्या सुंदर घराची झलकही पाहायला मिळते. या फोटोंमध्ये परिणीतीसोबत तिचा पती राघव चड्ढा देखील दिसत आहे. सध्या ती पती राघव चढ्ढासोबत तिचे वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे.

दरम्यान, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढाचे लग्न २४ सप्टेंबर २०२३ रोजी झाले होते. उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये हे कपल विवाहबंधनात अडकले. या शाही विवाहसोहळ्याला बॉलिवूडपासून राजकारणापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. परिणीतीने लग्नानंतर एक गाण्याचा व्हिडीओ शेअर केला होता. परिणीतीने लग्नातील काही क्षण एकत्र करत हा व्हिडीओ तयार केला होता. महत्वाचे म्हणजे तिने स्वत: गाणं गायले आणि हा व्हिडीओ राघवसाठी डेडीकेट केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: मुंबई-पुणे रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरची २० वाहनांना धडक

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

SCROLL FOR NEXT